ETV Bharat / state

दोन अट्टल चोरांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश, ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यानंतर अंबड पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून तब्बल ९ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

२ अट्टल चोरांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश
author img

By

Published : Jul 5, 2019, 9:51 AM IST

नाशिक - शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यानंतर अंबड पोलिसांनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून तब्बल ९ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दोन्ही चोरट्यांकडून १२ दुचाकींसह घरफोडी लंपास केलेला १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची लगड, 2 लाख 23 हजार 500 रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स घरगुती वस्तू असा एकूण 9 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघा संशयीतांना मागील चार महिन्यात केलेल्या गुन्ह्यांपैकी आयुक्तालय हद्दीतील चौदा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

२ अट्टल चोरांना पकडण्यात अंबड पोलिसांना यश

हवालदार भास्कर मल्ले, शिपाई दीपक वाणी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड लिंक रोड येथे सापळा रचला. मात्र, सापळ्याची कुणकुण संशयितांना लागल्यामुळे ते तीन दिवस या भागात फिरकले नाहीत. बुधवारी पहाटेच्या सुमारास दोघे संशयीत येणार असल्याची खात्रीशीर माहिती पुन्हा पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी पहाटे सापळा लावला. दोघे संशयित या ठिकाणी आले मात्र, सापळ्यात अडकण्याऐवजी निसटून पळ काढण्यास सुरूवात केली. यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर जमालुद्दिन उर्फ जमालू मोहम्मद अय्युब चौधरी (वय 22, राहणार अंबड मुळगाव उत्तर प्रदेश) मोहम्मद असराल मुस्ताक शहा (वय 21, राहणार भारतनगर वडाळा रोड मुळ गाव उत्तर प्रदेश) यांच्या मुसक्या आवळल्या.

Intro:शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी नंतर नाशिक पोलिसांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली त्या नंतर अंबड पोलिसांनी सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले या दोघांकडून तब्बल नऊ लाख 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय

Body: दोघा तरुण चोरट्यांकडून बारा दुचाकीसह घरफोडी लंपास केलेला एक लाख 65 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांची लगड ,2 लाख 23 हजार 500 रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स घरगुती वस्तू असा एकूण 9 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या दोघा संशयितांना मागील चार महिन्यात केलेल्या गुन्ह्यांपैकी आयुक्तालय हद्दीतील चौदा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली

Conclusion:आंबड गुन्हे शोध पथक चोरट्यांच्या मागावर असताना हवलदार भास्कर मल्ले, शिपाई दीपक वाणी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड लिंक रोड येथे सापळा रचला मात्र सापळ्याची कुणकुण संशयितांना लागल्यामुळे ते तीन दिवस या भागात फिरकले नाही बुधवारी पहाटेच्या सुमारास दोघे संशयित येणार असल्याची खात्रीशीर माहिती पुन्हा पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी पहाटे सापळा लावला दोघे संशयित या ठिकाणी आले मात्र सापळ्यात अडकण्याऐवजी निसटुन पळ काढण्यास सुरूवात केली यावेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर जमालुद्दिन उर्फ जमालू मोहम्मद अय्युब चौधरी वय 22 राहणार अंबड मुळगाव उत्तर प्रदेश ,मोहम्मद असराल मुस्ताक शहा वय 21 राहणार भारत नगर वडाळा रोड मुळ गाव उत्तर प्रदेश यांच्या मुसक्या आवळल्या

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.