ETV Bharat / state

मनमाड : महावितरण कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, वीज वितरण सोडून सर्व कामे ठप्प

author img

By

Published : Jul 8, 2020, 8:34 PM IST

मनमाड शहरात आज महावितरण कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाला बंद करण्यात आले असून विज वितरण सोडून सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत.

MSEDCL office
महावितरण कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

मनमाड (नाशिक) - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज महावितरण कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महावितरण कार्यालयाल बंद करण्यात आले असून वीज वितरण सोडून सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे इतर कामे ठप्प पडली आहेत.

नाशिक जिल्ह्यातील क्रमांक तीनचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या मनमाड जंक्शनमध्ये जवळपास सव्वा लाखाच्यावर लोकसंख्या आहे. शासनानेदेखील विशेष काळजी म्हणून येथे लक्ष घातले आहे. सुरुवातीला अगदी नगण्य असणाऱ्या शहरात आज कोरोनाचे 94 च्या वर रुग्ण आहेत. कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात अचानक रुग्णांची संख्या वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यात शहरातील महावितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कार्यालय बंद करण्यात आले आहे.

कार्यालय बंद केल्याने वीज वितरण सोडून सर्वच कामे ठप्प झालेली आहेत. आधीच तीन महिने वीज वितरण कंपनीच्या वतीने फक्त सरासरी बिल देण्यात आले होते, त्यामुळे अनेकांना आता एकत्रित बिल आल्याने वीज ग्राहकांनी महावितरण कार्यालयात गर्दी केली आहे. मात्र आता वीज वितरण कार्यालयच बंद असल्याने ग्राहकांना कार्यालय सुरू होण्याची वाट बघावी लागणार आहे.

सध्या कार्यालयात फक्त विज वितरण करणारे कर्मचारी असुन इतर विभाग पूर्णतः बंद करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांची मात्र गौरसोय होत आहे. कार्यालय बंद असेपर्यंत कोणीही कार्यालयात चकरा मारू नये सर्व ग्राहकांच्या तक्रारी सो़डविण्यात येतील, असे आवाहन उपअभियंता एस.बी. शिंदे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.