ETV Bharat / state

सिडकोत मद्यधुंद टोळक्याची रस्त्यावरील नागरिकांना मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद - mobs beat up civilians on the streets

सिडको परिसरात मद्यधुंद टोळक्यांनी रस्त्यावरील नागरिकांना शिवीगाळ व मारहाण करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उत्तमनगर परिसरात मद्यधुंद टोळक्याचा धुमाकूळ घालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना देखील मद्यधुंद टोळक्याकडून शिवीगाळ करण्यात आली.

घटना सीसीटीव्हीत कैद
घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Aug 26, 2021, 1:35 PM IST

नाशिक - नाशिकच्या सिडको परिसरात मद्यधुंद टोळक्यांनी रस्त्यावरील नागरिकांना शिवीगाळ व मारहाण करीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. उत्तमनगर परिसरात मद्यधुंद टोळक्याचा धुमाकूळ घालत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना देखील मद्यधुंद टोळक्याकडून शिवीगाळ करण्यात आली.

सिडकोत मद्यधुंद टोळक्याची रस्त्यावरील नागरिकांना मारहाण

सिडको परिसरात छोट्या-मोठ्या टवाळखोर गुंडांनी आपली दहशत माजवण्याचा प्रकार समोर येत आहे. एकीकडे शहरात पोलीस भाजप- सेनेमध्ये पेटलेला वाद मिटवण्यासाठी बंदोबस्तात होते तर दुसरीकडे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात मद्यधुंद अवस्थेतील युवकांनी उत्तम नगर परिसरामध्ये रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच महिलांना शिवीगाळ सुरू केली तसेच उत्तम नगर ते पवन नगर दरम्यान जोरदार गाडी चालवत नागरिकांना शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर काही वेळातच राजरत्न नगर येथे आपल्या घरी दळण घेऊन जात असलेले स्वप्नील पंगे यांना यातील दोन तरुणांनी विनाकारण बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजरत्न नगर परिसरात पंगे यांना मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत टवाळखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकाराबाबत अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.उत्तम नगर भागात मद्यधुंद टवाळखोरांनी रस्त्याने येणाऱ्या जाणा- या नागरिकांना शिवीगाळ व मारहाण करीत थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याचे समोर येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.