ETV Bharat / state

'वाटल होत घरी बसून 'एन्जॉय' करु', पण... नाशिकमध्ये तळीरामांचा हिरमोड

सोशल डिस्टनसिंगचे पालन करत चेहऱ्याला मास्क लावत तळीरामांनी मद्याच्या दुकानांवर दुकान उघडण्यागोदर रांगा लावल्या आहेत.

author img

By

Published : May 4, 2020, 12:20 PM IST

Nashik
नाशिकमध्ये तळीरामांचा हिरमोड

नाशिक - सध्या रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सुरू आहेत. मात्र, आता राज्य सरकारने रेड झोनमधल्या मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना लॉकडाऊनमध्ये अच्छे दिन येणार आहेत. सरकारच्या आदेशानंतर सकाळी-सकाळी तळीरामांनी दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणताही आदेश मिळाला नसल्याने दुकानदारांनी दुकाने अद्यापपर्यंत बंद ठेवली आहेत.

नाशिकमध्ये तळीरामांचा हिरमोड

सोशल डिस्टनसिंगचे पालन करत चेहऱ्याला मास्क लावत तळीरामांनी मद्याच्या दुकानांवर दुकान उघडण्यागोदर रांगा लावल्या आहेत. प्रशासनाने सोशल डिस्टनसिंगचं पालन करा, गर्दी करू नका, असे आवाहन जनतेला केले होते. मात्र, 40 दिवसांपासून दारूची दुकाने बंद असल्याने तळीरामांनी वाईन शॉपबाहेर जमायला सुरुवात केली आहे. मात्र, मद्य विक्री दुकाने सुरू न झाल्याने तळीरामांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिकच्या रेड झोनमध्ये नाशिक महानगरपालिका क्षेत्र, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र, मालेगाव तालुका, निफाड, चांदवड, येवला, नांदगाव, सिन्नर तालुका या क्षेत्राचा समावेश आहे. तर ऑरेंज झोनमध्ये नाशिक तालुका, देवळा, इगतपुरी, त्रंबक, डोरी, मनमाड, कळवण, पेठ, बागलान, सुरगाणा तालुक्याचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.