नाशिक- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ वाजेनंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात वाईन शॉप आणि बिअर बारचा समावेश करण्यात आल्याने पुढील पंचवीस दिवस दारूची दुकाने बंद असणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींनी साठा करून ठेवण्यासाठी दारूंच्या दुकानावर गर्दी केल्याचे दिसून आले.
हेही वाचा - 'अँटिलियासमोर गाडी कुणी ठेवली याचा तपास आधी झाला पाहिजे'
पोलिसांची कारवाई
शहरातील प्रत्येक वाईन शॉप दुकानावर एका वेळी 100 ते 150 मद्यप्रेमीनीं एका वेळी गर्दी केल्याचे दिसून आले. काही वाईन शॉपबाहेर मद्यप्रेमींनीं सोशल डिस्टंसिंग पालन केले, मात्र काही वाईन शॉपमध्ये मदयप्रेमाची झुंबड उडाल्याने पोलिसांनी आणि महानगर पालिका कर्मचार्यांनी 8 वाजेच्या अगोदरच दारू दुकाने बंद करून दुकान चालकावर दंडात्मक कारवाई केली. काही तळीरामांनी तर पुढील पंचवीस दिवस मद्य पुरेल एवढा स्टॉक घेत असल्याचे चित्र होते. तर काहींनी खिशाचा अंदाज घेत मद्य विकत घेतले.
मद्याचा काळाबाजार
नाशिक जिल्ह्यात पुढील 25 दिवस दारू दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमींची मोठी पंचायत झाली आहे. मागील वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये दारूचा मोठा काळाबाजार झाला होता. काही जणांनी काळाबाजार करत बाटलीच्या किंमती पेक्षा दुप्पट तिप्पट किमतींने मद्याची विक्री केली होती. यंदा देखील वाइन शॉप बंद असल्याने मद्याचा काळाबाजार होण्याचं बोलले जात आहे.
हेही वाचा - एन. व्ही. रमन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश!