नाशिक - सुरगाणा तालुक्यातील अलंगून बंधारा फुटल्यामुळे ( Alangun Dam Burst nashik ) बंधाऱ्याचे पाणी हे अलंगून गावामध्ये शिरला. त्यामुळे येथील अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. बंधारा फुटणार याची चुनक लागताच नागरिकांनी वेळीच गावाबाहेर गेल्याने मोठी जिवीतहानी टळली आहे. पावसाळ्यापूर्वीच बंधाऱ्याची उंची वाढवली होती, म्हणून ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
...अन् होत्याचं नव्हतं झालं : घटनास्थळी कुठली जीवितहानी झाली नसली तरी अनेक घर पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या अलंगून गाव हे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. अशाच गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले जात आहे. डोळ्यादेखत घर पाण्याखालील जात असल्याचे बघून नागरिकांना उघड्यावर राहण्याची वेळ आल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले आहे. नाशिक शहर वगळता जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यात हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचे संकेत दिले आहेत. गोदावरी नदीला पूर आला असून नदी काठच्या गावाना देखील सतरतेचा इशारा देण्यात आला आहे.