नाशिक : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने (Ajit Pawar Group) राष्ट्रवादी भवनावर कब्जा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाला तंबूत कार्यालय सुरू करण्याची वेळ आली आहे. काही दिवसापूर्वीच नाशिक शहरातील राष्ट्रवादी कार्यालयावरून दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. त्यावरुन राज्यात बरेच राजकारण तापले असतानाच मुंबई नाक्यावर शरद पवार गटाने तंबूत कार्यालय थाटले आहे.
आमच्याकडे बैठका घेण्यासाठी जागा नसल्याने आम्ही नवीन कार्यालय सुरू केलं. आम्ही शरद पवारांचे निष्ठावंत समर्थक आहोत, आमचे तंबूत कार्यालय असले, तरी त्यात सर्व सुविधा असतील - मुन्ना अन्सारी, शरद पवार समर्थक
पवार विरूद्ध पवार : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यभर अजित पवार आणि शरद पवार गटात संघर्ष होत आहे. दोघांमध्येही राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटाने अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची कार्यालये ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे पवार विरूद्ध पवार असा संघर्ष राज्यात सुरू आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शरद पवार गटावर तंबूत कार्यालय सुरू करण्याची वेळ आली आहे.
तंबूत कार्यालय सुरू : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी शरद पवार गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. तर काही ठिकाणी अजित पवार गटाचे प्राबल्य दिसत आहे. नाशिकमध्ये अजित पवार गटाने राष्ट्रवादी कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी भवन नेमकं कुणाचं असा प्रश्न राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना पडला होता. त्यानंतर हा वाद थेट शरद पवारांपर्यंत गेला होता. सध्या नाशिकमधील राष्ट्रवादी भवन अजित पवार गटाच्या ताब्यात आहे.
आम्ही शरद पवारांचे निष्ठावंत : नाशिकचे राष्ट्रवादी भवन कार्यालय, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे असून पोलिसांच्या मदतीने अजित पवारांचे समर्थक तेथे काम करत आहेत. आमच्याकडे बैठका घेण्यासाठी जागा नसल्याने आम्ही नवीन कार्यालय सुरू केलं. आम्ही शरद पवारांचे निष्ठावंत समर्थक आहोत, आमचे तंबूत कार्यालय असले, तरी त्यात सर्व सुविधा असतील असे शरद पवार गटाचे पदाधिकारी मुन्ना अन्सारी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -