नाशिक- जास्त मार्क मिळवणारा व्यवहारात हुशार असतोच असे नाही. कधीकधी कमी गुण मिळवणारा सुद्धा व्यवहारात हुशार असतो. म्हणून आज आम्ही सरकार स्थापन करून सत्तेत आलो असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा- 'सीएए संदर्भात बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही'
आज देशाचे आर्थिक बजेट सादर केले जाणार आहे. त्याकडे आमचे लक्ष आहे. बेरोजगारी, महागाई, उद्योग यासाठी सरकार काय पावले उचलणार आहे? याकेडीही आमचे लक्ष असणार असल्याचे पवार म्हणाले.