ETV Bharat / state

पीक नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर करा; नाशकात कृषीमंत्र्यांंचा पाहणी दौरा - Rain

नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश भुसे यांनी दिले आहेत.

नाशिक जिल्यातील नुकसानग्रस्त पिकांचे कृषी मंत्र्यांकडून पाहणी

author img

By

Published : Sep 26, 2020, 7:52 AM IST

नाशिक- जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी शेतात पावसाचे पाणी साठले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.

मालेगाव तालुक्यातील पाटणे, आधार खु, चिंचावड परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा, मका, भेंडी, डाळींब व ऊस पिकांची भुसे यांनी प्रत्यक्ष शेतात जात पाहणी केली. यात पाटणे येथील रामदास बुधा तांबे यांची भेंडी व डाळींब पिके, शेखर थोरात, आधार खु. यांचा मका आणि चिचावड येथील कारभारी गांगुर्डे यांचे मका, ऊस आदी पिकांची पाहणी करण्यात आली. तसेच सततधार पावसामुळे तालुक्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या कृषी क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करुन शासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

नाशिक जिल्यातील नुकसानग्रस्त पिकांचे कृषी मंत्र्यांकडून पाहणी
नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे कृषी मंत्र्यांकडून पाहणी

याबरोबरच ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगामात पिक विमा काढला आहे त्यांनी तत्काळ में.भारती अँँक्सा जनरल इन्शुरंस कंपनी लि. यांच्या टोल फ्री क्र. 1800-103-7712 तसेच ईमेल bharatkolhe7387@gmail.com व digvijay.kapse@bhartiaxacom याव्दारे कंपनीला इंटीमेशन (सुचना) कराव्यात. तसेच शासनाने विकसीत केलेल्या मोबाईल क्रॉप इन्शुरंस अँँपवरुन शेतीपिकाच्या नुकसानीची माहिती फोटोसह अपलोड करण्याच्या सूचना शेतकऱ्यांसह कृषी व महसुल प्रशासनास दिल्या आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.