नाशिक - राज्याचे कृषी मंत्री दादाभुसे यांचा शेतात पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात दौरा करत असताना कृषिमंत्री यांनी चिंचावड गावामधील एका शेतकऱ्याच्या शेतात औत धरत पेरणी केली आहे.
जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. मालेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी चिंचावड गावामधील एका शेतकऱ्याच्या शेतात औत धरत पेरणी केली आहे. मतदारसंघाचा दौरा सुरू असताना चिंचावड गावातील शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी पाहिले. त्यांनी लागलीच बांधावरून थेट शेतात जात औत हाती घेतले. कृषीमंत्र्यांनी लगेचच पेरणीला सुरुवात केली.
हेही वाचा-कोणी कितीही स्ट्रॅटजी तयार केली तरी नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार - देवेंद्र फडणवीस
थेट कृषिमंत्र्यांनीच शेतात औत धरल्याचे बघून परिसरातील शेतकऱ्यांना सुखद धक्काच बसला. मंत्री दादा भुसे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जमिनीत पुरेशी ओल असेल तर पेरणी करा, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले. राज्य सरकार शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा तुटवडा भासू देणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.
हेही वाचा-अपहरण करून हत्या झालेल्या १६ वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल