ETV Bharat / state

दिंडोरी तालुक्यात खरबूज शेतीवर कोरोनाचे संकट, शेतकऱ्यांनी केली मदतीची मागणी - nashik

८ दिवसानंतर खरबूज काढणीला येतील. मात्र, कोरोना विषाणूमुळे मजूर मिळत नसल्याने आणि मालाची निर्यात बंद असल्याने खरबुजांचे काय करावे ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

corona dindori
शेतकरी वैभव गायकवाड
author img

By

Published : Apr 3, 2020, 12:25 PM IST

नाशिक- लॉकडाऊन व संचारबंदीचा फटका द्राक्षशेती व खरबूज पिकाला बसला आहे. शेतात तयार झालेला माल बाजारात विक्रीसाठी नेता येत नाही, निर्यातीसाठी पाठवता येत नाही, यामुळे पिकांची मोठी हानी होत आहे. आस्मानी संकटातही जगवलेलं पीक आता विषाणूच्या संकटात सापडल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे.

माहिती देताना शेतकरी वैभव गायकवाड

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांना नुकसान झाले आहे. पालखेड बंधारा येथील शेतकरी काका गायकवाड व वैभव गायकवाड यांच्या द्राक्षशेतीबरोबर खरबूज शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी खरबूज शेतीसाठी जवळपास २५ लाख रुपये खर्च केले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरबूज शेती धोक्यात आली आहे.

८ दिवसानंतर खरबूज काढणीला येतील. मात्र, कोरोना विषाणूमुळे मजूर मिळत नसल्याने आणि मालाची निर्यात बंद असल्याने खरबुजांचे काय करावे ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तरी शासनाने व लोकप्रतिनिधींनी यावर त्वरित लक्ष घालून निर्यात बंदी उठवावी आणि होत असलेल्या नुकसानीवर उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा- नाशिकच्या काळाराम मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच रामनवमी भाविकांविनाच साजरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.