नाशिक - शहरात तब्बल पावणेदोन वर्षानंतर कोरोना रुग्णांची शून्य ( Zero corona cases in Nashik ) नोंद झाली आहे. शहरात कोरोना मुक्तीचे प्रमाणही 98.47 टक्क्यांवर आल्याने ( corona recovery rate 98.47 in Nashik ) समाधान व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत शहरात 59 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिक शहरातील पहिला कोरोनाबाधित 6 एप्रिल 2020 रोजी ( first corona patient in Nashik ) आढळला होता. तर 12 मे 2020 रोजी शहरात कोरोनाचा पहिला बळी गेला होता. नाशिक शहरात एकूण 2 लाख 72 हजार 757 जणांना कोरोनाची ( total corona cases in Nashik ) लागण झाली आहे. त्यापैकी 4 हजार 105 जणांचा या रोगाने मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत 76 हजार जणांना लागण तर एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी 2021 ते मे 2021 या काळात प्रचंड हाहाकार झाला होता. यात दीड लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजारांहून अधिक जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.
हेही वाचा-Nashik Police Station Unauthorized : नाशिकमधील 72 पैकी 65 पोलीस चौक्या अनधिकृत; आयुक्त पांडये
तिसऱ्या लाटेत मृत्यूदराचे प्रमाण कमी राहिले-
जानेवारी 2022 वर्षाच्या सुरुवातीला ओमायक्रोम या नव्या व्हेरियंटची तिसरी लाट आली. या लाटेत संसर्गाचा वेग प्रचंड होता. मात्र बहुसंख्य रुग्ण घरीच बरी होत असल्यानs रुग्णालयावर कमी ताण आला. तसेच या काळात कोरोना प्रतिबंधक लसीचेदेखील प्रमाण वाढल्याने मृत्यूचे प्रमाण कमी राहिले आहे. जवळपास पन्नास हजारांहून अधिक रुग्ण तिसर्या लाटेत बाधित झाले आहेत. परंतु मृत्यूदर कमी राहिला.
हेही वाचा-Nitin Gadkari Reaction : गोव्यानंतर आता 'मिशन महाराष्ट्र 2024', राज्यात भगवा फडकणार - नितीन गडकरी
98.11टक्के रुग्ण झाले बरे
नाशिक जिल्ह्यातील कोरोना मुक्तीचे प्रमाण 98.8 टक्के वर आहे, नाशिक शहरात 98.7 टक्के ग्रामीण मध्ये 97.5 टक्के , मालेगाव मनपा हद्दीत 97,67 टक्के, जिल्हा बाह्य 98.8 टक्के तर जिल्ह्यातील इतर भागात शंभर टक्के पूर्ण कोरोना मुक्त आहेत.