दिंडोरी (नाशिक) - येथील ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे व अधिपरिचारिका श्रीमती धात्रक मालेगाव येथील कोविड रुग्णालयात १४ दिवस सेवा करून दिंडोरीत परतल्यावर त्यांचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील व कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले होते व त्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी व सेविका यांची नियुक्ती इतर तालुक्यातून तेथे करण्यात आली होती. दिंडोरी येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर काळे आणि अधिपरिचारिका श्रीमती धात्रक मालेगाव कोविड रुग्णालयात १४ दिवस सेवा देऊन आल्यानंतर ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी येथे त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास पाटील, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केले.