नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, पेढे वाटून आनंद साजरा केला आहे.
हेही वाचा - राज ठाकरे अयोध्येला जाणार, नांदगावकर यांची माहिती
राज ठाकरे यांच्या निर्णयाचे समर्थन आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी अयोध्येत जाण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. या वेळी, नाशिकमध्ये मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज ठाकरे यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या वेळी, ठाकरे यांच्या या घोषणेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाके वाजवत आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.
नाशिकहून हजारो कार्यकर्ते अयोध्येला जाणार
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकहून हजारो कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. प्रभू रामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परत गेले होते आणि त्यांचा वनवास संपला होता. त्याच प्रकारे मनसेलादेखील चांगले दिवस येतील, असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - रेल्वे अर्थसंकल्प: हक्काची रेल्वे पुन्हा सर्वसामान्यांना घेऊन कधी धावणार? नागपूरकरांचा सवाल