नाशिक : देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशभरातून या चित्रपटाला विरोध केला जात आहे. या चित्रपटावर संपूर्ण देशात बंदी घालण्याची मागणी देशभरातून होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष चित्रपट आता वादाच्या भवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटातील टपोरी संवादावर लोकांनी आक्षेप घेतला आहे.
चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी : या चित्रपटात प्रभास राघवच्या भूमिकेत दिसला आहे. तर, क्रिती सेन सीतेच्या भूमिकेत तसेच सैफ अली खानने लंकेशची भूमिका केली आहे. जलेगी तेरे बाप की, हा टपोरी टाईप डायलॉग बोलताना भगवान हनुमानाची व्यक्तिरेखा पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी यावर खुलासा करायला सुरुवात केली, तेव्हा प्रेक्षक अधिक संतापले. या चित्रपटाच्या काही संवादांवर बरीच टीका झाल्यानंतर निर्मात्यांनी ते बदलण्याची घोषणा केली आहे.
चित्रपटाचा विरोध : अशात आता नाशिक येथील साधू महंतांनी या चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. सरकारने या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच सेन्सर बोर्डाने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सर्टिफिकेट प्रमाणपत्र कसे दिले? यावरही त्यांनी बोट ठेवले आहे. ठीक-ठिकाणी या चित्रपटाचा विरोध होत असताना दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार आदिपुरुष चित्रपटाने दोन दिवसात जगभरात 230 कोटीची कमाई केली आहे.
आदिपुरुष वादावर मुख्यमंत्री बघेल यांचे ट्विट : सेन्सॉर बोर्डाच्या बहाण्याने केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, 'सेन्सॉर बोर्डाने बघायला हवे होते. ज्या पद्धतीने आमचे महापुरुष, जे आमचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्यावर अशाप्रकारे शब्द उच्चारणे योग्य आहे का? अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. आदिपुरुष वादावर ट्विट करून मुख्यमंत्री बघेल यांनी केंद्राकडे याबाबत उत्तर मागितले आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहिले, 'मी 'आदिपुरुष' बद्दल वाचले आणि ऐकले आहे. सेन्सॉर बोर्डाने आमच्या श्रद्धेशी खेळणार्या या चित्रपटाला प्रमाणपत्र कसे दिले? याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागेल. आमच्या दैवत रामचा अपमान आम्ही सहन करणार नाही, तसेच जबाबदार व्यक्तींनी माफी मागावी.
हेही वाचा -
Demand To Ban Adipurush संपूर्ण देशात आदिपुरुष या चित्रपटावर बंदीची मागणी भाजप नेत्यांनीही केला निषेध