ETV Bharat / state

अभिनेता अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला दिलेली परवानगी वादात.. छगन भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश - अक्षय कुमार नाशिक दौरा वाद

अक्षय कुमार हा चार दिवसांपूर्वी वैयक्तिक कामासाठी नाशिक जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टवर आला होता. त्यासाठी अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला विशेष परवानगी देण्यात आली होती. राज्यात मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा मिळत नसताना अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली? याची चौकशी होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Akshay Kumar
अक्षय कुमार
author img

By

Published : Jul 4, 2020, 3:48 PM IST

Updated : Jul 4, 2020, 6:15 PM IST

नाशिक - अभिनेता अक्षय कुमारने नाशिकचा केलेला हेलिकॉप्टरचा दौरा वादात सापडला आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आणि पावसाच्या दिवसात हेलिकॉप्टरला परवानगी देणे योग्य आहे का? राज्यात मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा मिळत नसताना अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली? याची चौकशी होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

अभिनेता अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला दिलेली परवानगी वादात

अक्षय कुमार हा चार दिवसांपूर्वी वैयक्तिक कामासाठी नाशिक जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टवर आला होता. त्यासाठी अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला विशेष परवानगी देण्यात आली होती. त्याचे हेलिकॉप्टर त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब ह्या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर असलेल्या हेलिपॅडवर उतरले. अक्षय कुमारने त्रंबकेश्वरजवळील एका रिसॉर्टवर मुक्काम केला होता. कोरोनामुळे राज्यातील मंत्र्यांनाही व्हीआयपी सुविधा मिळत नसताना जिल्हा प्रशासनाने अभिनेत्याला दिलेल्या सुविधेवरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नाशिक जिल्हा प्रशासन आणि अभिनेता अक्षय कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब ह्या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर असलेल्या हेलिपॅडवर अक्षय कुमारचे हेलिकॉप्टर उतरले

नाशिक प्रशासनाने नियम डावलून अक्षय कुमारला दिलेला व्हीआयपी ट्रीटमेंटचा हा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भागात राहिला असतानाही अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट(सुरक्षा करणारा गट) कसा? याबद्दलही भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये हॉटेल, मॉल यांना अद्याप परवानगी देण्यात आली नाही. राज्यात मुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्र्यांनाही आपापल्या गाड्यांनी दौरे करावे लागत आहेत.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना देखील उपचारासाठी मुंबईला येण्यासाठी कुटुंबीयांनी विशेष विमानाची परवानागी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली होती. असे असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला हेलिकॉप्टरसाठी नाशिक जिल्ह्यात परवानगी कशी मिळाली? बाबत चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

Last Updated : Jul 4, 2020, 6:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.