ETV Bharat / state

मोसम नदी पात्रातून वाळू तस्करी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई - नाशिक वाळू तस्करी

वाळूची चोरटी वाहतूक रोखण्याची आणि यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेली शासकीय यंत्रणा कोरोनाच्या अतिरिक्त कामात अडकली आहे. याचा गैरफायदा घेत वाळू तस्कर पुन्हा सक्रिय होऊ पाहत आहेत. या संदर्भात स्थानिक तरुणांनी आवाज उठवताच संबंधित यंत्रणेला जाग आली असून वाळू चोरांवर दंडात्मक कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

sand
वाळू
author img

By

Published : May 16, 2020, 9:59 AM IST

नाशिक(सटाणा) - बागलाण तालुक्यातील मोसम नदी पात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीच्या मुद्दा पुन्हा जोरदार चर्चेत आला आहे. वाळू चोरीत सक्रिय होऊ पाहणाऱ्या मुजोर वाळू तस्करांचा ठोस बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात स्थानिक तरुणांनी आवाज उठवताच संबंधित यंत्रणेला जाग आली असून वाळू चोरांवर दंडात्मक कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.

वाळूची चोरटी वाहतूक रोखण्याची आणि यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी असलेली शासकीय यंत्रणा कोरोनाच्या अतिरिक्त कामात अडकली आहे. याचा गैरफायदा घेत वाळू तस्कर पुन्हा सक्रिय होऊ पाहत आहेत. यावर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक तरुण प्रयत्नशील आहेत. मात्र, प्रशासनाने यावर ठोस भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांच्या कडून व्यक्त होत होती.

त्यामुळे आता ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी तातडीने जेसीबीच्या सहाय्याने नदी काठावर चर खोदून प्रतिबंधात्मक उपाय केला आहे. यामुळे नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जाता येणार नाही. काही वाळू तस्करांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिले आहे.

या वर्षी जानेवारीपासून वाळू तस्करांवर पाच कारवाया झाल्या आहेत. वाळू चोरी होऊ नये म्हणून नदीपात्रात जेसीबीच्या सहाय्याने चर करण्यात आले आहेत. तसेच एका वाळू माफियावर दंडात्मक कारवाई होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही वाळू माफियांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जायखेडा येथील अधिकारी एस. के. खरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.