नाशिक - जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरुन दर्शन घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला होता. ओव्हरटेक करण्याच्या नादात ही दुर्घटना देवळा मालेगाव रस्त्यावर झाली. या अपघातात जळगावमधील ३१ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.
देवळा तालुक्यातील खुंटेवाडी गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाकडून बसचा ताबा सुटला व बसने समोरच्या वाहनाला धडक दिली व थेट रस्त्याशेजारील नाल्यात गेली. या अपघातात चालक व वाहक यांच्यासह ३१ प्रवासी जखमी झाले आहे. विशेष म्हणजे अपघात झाला त्या वेळी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता भामरेंनी स्वत:च्या गाडीतून जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.