नाशिक - येथील येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी उन्हाळ कांदा विक्रीसाठी आणला असता या कांद्याला प्रतिक्विंटलला 12 हजार,250 रुपये भाव मिळाला आहे. आजवरच्या इतिहासात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याची नोंद झाली आहे.
![Acche din to onion in nashik, got 12 thousand quintle](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-yeolakanda-mhc10071_03122019085138_0312f_1575343298_6.jpg)
येवला बाजार समितीत मागील हप्त्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली. या सोमवारी उन्हाळ कांद्याच्या बाजार भावात वाढ होऊन प्रतिक्विंटलला 12 हजार 250 भाव मिळाला आहे. सोमवारी बाजार समितीत 800 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यात उन्हाळ कांदाला किमान 2000 ते कमाल 12250 तर सरासरी 11300 असा भाव मिळाला. कांद्याला प्रति क्विंटल 12 हजारच्या पुढे भाव मिळाल्याने शेतकरी आनंदी आहे. आजवरच्या इतिहासात येवल्यात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे.
हेही वाचा - ठाण्यातील मेट्रोसाठीच्या वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे यंदा उन्हाळ कांद्याच्या उत्पादनात घट झाली. सगळीकडे कांद्याला मागणी वाढल्याने दरात तेजी अली आहे. म्हणून बाजारात नवीन कांदा जास्त प्रमाणात येईपर्यँत कांद्याच्या भावात तेजी कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा - सोनई ऑनर किलिंग : चार आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम