ETV Bharat / state

Abu Azmi : खोट्या लोकांशी कधीच युती करणार नाही - अबू आझमी

खोट्या लोकांशी कधीच युती करणार नाही तसेच आगामी काळात मालेगाव महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सांगितले. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आज मालेगाव दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 11, 2022, 9:52 PM IST

नाशिक (मालेगाव) : मालेगाव सारख्या इतर अल्पसंख्यांक शहरात पक्षाची ताकत वाढवण्यासाठी निघालो आहे. त्यामुळे जनता मला साथ देईल ही अपेक्षा आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा चांगली आहे. त्यांना भाजपासोबत लढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मी त्यासाठी पार्थना करत आहे. खोट्या लोकांशी कधीच युती करणार नाही तसेच आगामी काळात मालेगाव महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी ( Abu Azmi ) यांनी सांगितले. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु असिम आजमी आज मालेगाव दौऱ्यावर ( Abu Azmi in Malegaon ) आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी माध्यमांशी संवाद साधताना

या पक्षासोबत कधीच युती करणार नाही - एमआयएम या पक्षाशी कधीच युती करणार नाही. मला खोट्या लोकांसोबत युती करायची नाही असे म्हणत त्यांनी खासदार ओवेसी यांना टोला लगावला. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे ती काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने योग्य असुन यामुळे त्यांना भाजपसोबत लढण्यासाठी ताकत मिळणार आहे.

विधान सभेत आमदारांची संख्या वाढविण्याकडे लक्ष - मालेगाव सारख्या अल्पसंख्यांक शहरात जाऊन पक्षाची ताकत वाढवण्यासाठी मी प्रयत्न करत असून मालेगाव महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायची आहेत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासह सध्या विधानसभेत आम्ही समाजवादी पक्षाचे 2 आमदार आहोत ही संख्या वाढवून 5 ते 8 कशी होईल यासाठी देखील प्रयत्न करत आहोत, असेही आजमी यांनी सांगितले तर मागील वर्षी 12 नोव्हेंबरला मालेगाव मध्ये दगडफेक झाली होती. यात अनेकांना अजूनही जामीन मिळाला नाही. आज मालेगाव मध्ये आले आहात वर्षभर कुठे होता असा प्रश्न केला असता त्यांनी त्यालाही खोचक असे उत्तर देत मी एसीमध्ये एशोआराम करत होतो असे उत्तर दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.