नाशिक : गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मकरसंक्रांतीनिमित्त कारागीर पतंग बनवण्यास सुरुवात करता. यावेळी पतंगाच्या कच्च्या मालामध्ये वाढ झाल्यामुळे यावेळी पतंगाच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली असून गोंडेदार, अंडेदार, कवटीदार, कल्लेदार, अशा अनेक प्रकारचे ,विविध आकारांचे पतंग तयार झाले आहेत. यावेळी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला पतंग देखील मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने, कारागीर हे पतंग तयार करत आहेत. पतंगांवर राजकारण्यांच्या फोटोंची यावेळी मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
आसारीच्या किमतीत वाढ : गेल्या शंभर वर्षांपासून आसारी कारागीर पिढ्यान पिढ्या पतंग उडवण्यासाठी जी आसारी लागते, ती आसारी तयार करण्याचे काम करत आले आहे आहेत. विविध आकाराच्या सहा पाती, आठ पाती, बारा पाती अशा विविध आसाऱ्या तयार करत असून, बाहेरून जो कच्चामाल येतो तो महाग झाल्याने यावेळी आसारीच्या किमतीत देखील 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राखीवर फोटो : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यावर्षी पतंगांवर पोटो छापून आला आहे. गेल्यावर्षी ठाण्यात रक्षाबंधनाला राख्या तयार करण्यात आल्या त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो छापून आला होता. त्यावेळी राख्या घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले असे मत राखी विकणारांनी सांगितले होते. दरम्यान, यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांच्या फोटोचा पतंगही बाजारात आला आहे. दरम्यान, हा पतंगही लोकांच्या पसंतीस उतरला आहे असही दुकानदार सांगत आहेत.
पतंग का उडवला जातो : तमिळच्या तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकरसंक्रांतीवर पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोचला. स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. त्याला पतंग खूप आवडला आणि तो त्याने आपल्याकडे ठेवला असेही सांगितले जाते. जयंतच्या पत्नीने विचार केला की, ज्याचा हा पतंग आहे, तो घ्यायला नक्कीच येईल. तिकडे भगवान रामाने हनुमानजीला पतंग आणण्यासाठी पाठवले.
पतंग परत केला : हनुमानजींनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी भगवान रामला भेटण्याची इच्छा केली. ती म्हणाली की ती श्रीरामांच्या दर्शनानंतरच पतंग परत करेल. हनुमानजींनी भगवान रामाला संपूर्ण प्रसंग सांगितला. भगवान राम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजीला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान रामाचा आदेश सांगितला. त्यानंतर त्यांनी पतंग परत केला.
हेही वाचा : ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती