ETV Bharat / state

Murder Case : आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या आश्रमात चार वर्षीय बालकाचा खून

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षीय बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आलोक शिंगारे असे या बालकाचे नाव आहे. (A four year old boy was killed in suicidal farmers ashram)

Alok Shingare
आलोक शिंगारे
author img

By

Published : Nov 23, 2022, 10:57 AM IST

नाशिक: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच गरीब कुटुंबातील मुलांसाठी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चार वर्षीय बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आलोक शिंगारे (Alok Shingare) असे या बालकाचे नाव आहे. (A four year old boy was killed in suicidal farmers ashram)

मुलाचा गळा वळून खून केल्याचे उघडकीस आले: पोलिसांना दिलेली माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्था आश्रमात 22 नोव्हेंबरला सकाळी सात वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरच्या बाजूला आलोक शिंगारे मृत अवस्थेत आढळला. आश्रमातील अशोक पाटील (Ashok Patil) यांनी संस्थेच्या वाहनातून त्याला उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन साठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची गंभीर दखल घेत इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. या अहवालात मुलाचा गळा वळून खून केल्याचे उघडकीस आले.

पोलीस कसून चौकशी करणार: घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी कविता पडतरे,निरीक्षक संदीप रणदिवे, उपनिरीक्षक चंद्रभान जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. आलोक हा मूळचा उल्हासनगरमधील असून तो आश्रमात कोणासोबत राहत होता, तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आश्रमात खुनाची गंभीर घटना घडल्याने पोलिसांकडून संस्था चालकासह आश्रमातील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.

भांडण झाल्याचे तपासात पुढे आले: आलोकचे सायंकाळी आश्रमातील मुलांसोबत भांडण झाले होते. त्यातून तर हा प्रकार झाला नाही ना याचा तपास सुरू आहे. अलोकचा मोठा भाऊ ही याच आश्रमात आहे. दरम्यान आश्रमातील मुलांचे समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ञांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आश्रमात छळ होत असल्याच्या तक्रारी उघडकीस: आश्रमात यापूर्वी मुलांचा छळ होत असल्याबाबत अनेक तक्रारी आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्या दृष्टीने ही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.