नाशिक - मद्य विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर आज दुपारनंतर नाशिकमधील मद्य विक्रीचे दुकाने सुरू झाले. सकाळपासूनच तळीरामांनी मद्य दुकानांसमोर मोठी रांगा लावली होती. दुपारी मद्याची दुकाने सुरू होताच तळीरामांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, कुठल्याही प्रकारे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र नाशिकच्या बहुतांश वाईन शॉपसमोर बघायला मिळत आहे.
एकीकडे नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मद्य विक्रीसाठी दिलेली परवानगी आणि तळीरामांकडून सामाजिक अंतर ठेवण्याच्या आदेशाचे होणारे उल्लंघन धोकादायक असल्याचे नाशिककरांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर अशीच गर्दी राहीली तर कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
हेही वाचा - पहिला लाभार्थी 'मीच', मद्य मिळवण्यासाठी तळीरामांमध्ये चढाओढ.. मद्यविक्री दुकानांसमोर रांगा