ETV Bharat / state

नाशिकमधील कारागृहातील कैद्याने बनवल्या आकर्षक गणेश मूर्ती...

author img

By

Published : Aug 14, 2019, 9:56 PM IST

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा सागर पवार हा पेण मधील गणेश मूर्ती बनविणारा कारागीर आहे. आपल्या कलेला वाव मिळावी म्हणून त्यांनी जेल प्रशासनाला विनंती करून जेलमध्येच अत्यंत सुबक अशा शाडूमातीचे गणपती बनविण्याचा उपक्रम सुरू केला. त्याच्या विनंतीवरून जेलर यांनी त्याला गणपती बनविण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करून दिली. आणि सागरने देखील जन्माने कोणी गुन्हेगार नसतो हे सिद्ध करत आपणसुद्धा एक चांगली व्यक्ती बनू शकतो याचा आदर्श इतर कैद्यांसमोर ठेवला आहे.

गणेश मूर्ती

नाशिक - कारागृह म्हटलं की सर्वानाच समोर दिसते ती काळकोठडी आणि शिक्षा भोगणारे कैदी. मात्र, चार भिंतींच्या आड कारागृहात हे कैदी काय करतात? त्यांच्या आवडी निवडी कशा जोपासतात. तर, कैद्यांमधे लपलेल्या कलाकाराचे कला-कौशल्यही याच काळकोठडीत बघायला मिळते. सध्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील काळकोठडीत शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यांनी बनवलेल्या आकर्षक गणेश मुर्त्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नाशिकमधील कारागृहातील कैद्याने बनवल्या आकर्षक गणेश मूर्ती

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या गणेशोत्सवाचा एक वेगळाच अनुभव कैदी आणि अधिकाऱ्यांना येत आहे. जो अनुभव अधिकाऱ्यांच्या मनाला समाधान देणारा तर कैद्यांना काही चांगलं करून दाखवण्याची जिद्द देणारा आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा सागर पवार हा पेण मधील गणपती बनविणारा कारागीर आहे. आपल्या कलेला वाव मिळावा म्हणून त्याने जेल प्रशासनाला विनंती करून जेलमध्येच अत्यंत सुबक अशा शाडूमातीचे गणपती बनविण्याचा उपक्रम सुरू केला. त्याच्या विनंतीवरून कारागृह अधीक्षकांनी त्याला गणपती बनविण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करून दिली आणि सागरने देखील जन्माने कोणी गुन्हेगार नसतो, हे सिद्ध करत आपणसुद्धा एक चांगली व्यक्ती बनू शकतो याचा आदर्श इतर कैद्यांसमोर ठेवला आहे.

अत्यंत सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या या गणेशमूर्ती सागरने कुठल्याही साच्याचा वापर न करता हातानेच बनवल्या आहेत. या मुर्त्या येणाऱ्या गणेशोत्सव काळात जेल प्रशासन विक्री करणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सागर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अत्यंत सुंदर अशा गणेश मूर्ती बनवत आहे. इतर कैद्यांना देखील त्यानी ही कला शिकवून जवळपास २० कैद्यांच्या मदतीने या वर्षी सागरने तब्बल आठशे गणेश मूर्ती बनवल्या आहेत. मागच्या ३ वर्षांपासून सागरने बनवलेल्या गणेश मूर्तींना संपूर्ण राज्यातून मागणी असते. यंदाच्या वर्षी देखील जवळपास ५ ते ६ महिन्यांपासून सागर इतर कैद्यांच्या मदतीने जवळपास ८०० मुर्त्या बनवल्या आहेत. यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे सागरने जवळपास 12 फूट अशी भव्य गणेश मूर्ती तयार केली आहे. यंदाच्या वर्षी या सर्व मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृहाबाहेर असलेल्या एका हॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. तसेच इतर वस्तूंचे देखील प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. बुधवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

जेल म्हणजे फक्त गुन्हेगारांना बंदिस्त करण्यासाठी नसून त्यांना जगण्याची दिशा देणारे एक माध्यम असते. याच उद्देशाने जेल प्रशासनाने सागर सारख्या कलाकारांना हेरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याची भावना जेल अधीक्षकांनी यावेळी व्यक्त केली.

Intro:कारागृह म्हटलं की सर्वानाच समोर दिसते ती काळीकोठडी..आणि शिक्षा भोगणारे कैदी..एखादि लहान चूक आयुष्यात आपल्या हातून नकळत घडते..आणि तोच गुन्हा ठरून आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते..लहान मोठ्या चुका झाल्याने अनेकांच आयुष्य वाया गेलय मात्र चार भिंतींच्या आड कारागृहात हे कैदी काय करतात..त्यांच्या आवडी निवडी कशा जोपासतात या कैद्यांमधे लपलेल्या कलाकाराचा आविष्कार याच काळकोठडीत बघायला मिळतो...याच काळकोठडीत शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यांनी बनवलेल्या आकर्षक गणेश मुर्त्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.Body:नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या गणेशोत्सवाचं एक वेगळाच अनुभव कैदी आणि अधिकाऱ्यांना येत आहे..जो अनुभव अधिकाऱ्यांच्या मनाला समाधान देणारा तर कैद्यांना काही चांगलं करून दाखवण्याची जिद्द देणारा आहे.... नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणारा हा आहे सागर पवार.... हा सागर पेण मधील एक गणपती बनविणारा कारागीर आहे...आपल्या कलाला वाव मिळावं म्हणून त्यांनी जेल प्रशासनाला विनंती करून जेलमध्येच अत्यंत सुबक अशा शाडूमातीचे गणपती बनविण्याचा उपक्रम सुरू केलाय..अर्थात विनंती केल्यानंतर जेलर साहेबांनी त्याला गणपती बनविण्यासाठीच आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध करून दिलं आणि सागर ने देखील जन्माने कोणी गुन्हेगार नसतो हे सिद्ध करत आपण सुद्धा एक चांगली व्यक्ती बनू शकतो याचा आदर्शच इतर कैद्यांसमोर ठेवलाय...अत्यंत सुबक आणि आकर्षक दिसणाऱ्या या गणेशमूर्ती सागर ने कुठल्याही साचाचा वापर न करता हातानेच बनविल्या आहेत..आणि या मुर्त्या येणाऱ्या गणेशोत्सव काळात जेल प्रशासन विक्री करणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून सागर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अत्यंत सुंदर असे गणेश मूर्ती बनवत आहे इतर कैद्यांना देखील त्यांनी हे कला शिकवून जवळपास बीच कायद्यान च्या मदतीने या वर्षी सागरने तब्बल आठशे गणेश मुर्ती बनवले आहेत...मागच्या तीन वर्षांपासून सागर ने बनवलेल्या गणेश मूर्तींना संपूर्ण राज्यातून मागणी असते यंदाच्या वर्षी देखील जवळपास पाच ते सहा महिन्यांपासून सागर इतर कैद्यांच्या मदतीने जवळपास आठशे मुर्त्या बनवले आहेत यंदाच्या वर्षी विशेष म्हणजे सागरने जवळपास 12 फूट अस भव्य गणेश मूर्ती देखील तयार केली आहे.यंदाच्या वर्षी या सर्व मूर्ती नाशिक मध्यवर्ती कारागृह बाहेर असलेल्या एका हॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत तसेच इतर वस्तूंचे देखील प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे आज या प्रदर्शनाचे उद्घाटन नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते झाले.

1)बाईट -विश्वास नांगरे पाटील (पोलीस आयुक्त नाशिक) Conclusion:जेल म्हणजे फक्त गुन्हेगारांना बंदिस्त करण्यासाठी नसून त्यांना जगण्याची एक दिशा देणारं माध्यम असतं आणि याच उद्देशाने जेल प्रशासनाने सागर सारख्या कलाकारांना हेरून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याची भावना जेल अधीक्षक यांनी व्यक्त केली

2)बाईट -प्रमोद वाघ (कारागृह अधीक्षक)

जन्माला येणाऱ्या प्रत्येकात काही न काही गुण असतो पण त्याला फक्त जोड हवी असते एका शाबासकीची आणि कौतुकाची थाप.....तेच थाप जेल प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांनी सागर सारख्या कैद्यावर मारली आणि सागर देखील मिळालेल्या संधीच सोनं करण्यात गुंतलाय..जेलमध्ये सागर करत असलेलं काम इतर कैद्यांना देखील प्रेरणादायी ठरत आहे..आणि आता अनेक कैदी आपल्यातल्या सुप्त गुणाना वाव देण्यासाठी पुढे येत आहेत.. यातूनच एक नवी पिढी आणि जेलचा नवा अध्याय तयार होणार हे जरी निश्चित असलं तरी जेल प्रशासनाच्या या सक्षम अधिकाऱ्यांमुळेच जेलची भीतीयुक्त व्याख्या बदलेल आणि हे कैदीसुद्धा समाजाचा एक चांगला घटक बनतील अशीच सर्वांना अपेक्षा आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.