ETV Bharat / state

मालेगावात पुन्हा 8 नवे कोरोनाग्रस्त, बाधीत पोलिसांचा आकडा 70 वर - कोरोना

मालेगावात आज 8 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची 371 वर पोहोचली असून एकट्या मालेगावात 331 कोरोनाबाधित आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : May 4, 2020, 8:15 PM IST

मालेगाव (नाशिक) - शहरात सर्वसामान्य नागरिकांबरोबर आता पोलीस कर्मचारी हे देखील कोरोनाबाधित होत असल्याने पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे. राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त पोलीस हे मालेगाव शहरात असल्याने पोलीस दलात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत साधारण 70 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून अनेकांचे अहवाल प्रलंबित आहे. आज मालेगावात 8 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहे. जिल्ह्याची कोरोनाग्रस्तांची 371 वर पोहोचली असून एकट्या मालेगावात 331 कोरोनाबाधित आहेत.

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 17 बाधित असून इतर ग्रामीण भागातही 17 बाधित आहे. तर अन्य ठिकाणाहून आलेले सहा आणि उर्वरित 12 जणांचा मृत्यू झाल्याचे नोंद नाशिक जिल्ह्यात झालेली आहे.

नाशिक शहरांमधील एक रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला. सार्वजनिक आरोग्य विभाग महानगरपालिका नाशिकतर्फे विविध पथके तयार करून तातडीने त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले. नव्याने प्रतिबंधित क्षेत्र जनरल वैद्यनगर येथे तयार करण्यात आलेला आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालातील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये एक महिला डॉक्टर आहे. ती खासगी रुग्णालयात सेवा देत आहेत. त्या एका बाधित रुग्णाला सेवा देताना संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे सहकारी डॉक्टर व इतर संपर्कात आलेला स्टाफ क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे अहवाल तपासणीसाठी पाठविलेले आहेत.

हेही वाचा - पुणेगाव धरणात आढळला युवकाचा मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.