ETV Bharat / state

नाशिकमध्ये बळीराजा सुखावला; 73 टक्के पेरण्या पूर्ण

यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यात नाशिक विभागात 178 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी 211 मिलीमीटर पेक्षा हा आकडा कमी असला, तरीही या भागात मुबलक जलसंचय झाल्याने नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात 73 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

author img

By

Published : Jul 20, 2019, 1:56 PM IST

नाशिक -

नाशिक विभागात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या 73 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, यामुळे काही प्रमाणात बळीराजा सुखावला आहे. पावसासाठी मराठवाड्यात सरकार कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. परंतु, यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यात नाशिक विभागात 178 मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी 211 मिली मीटर पेक्षा हा आकडा कमी असला, तरीही या भागात मुबलक जलसंचय झाल्याने नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात 73 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

मात्र, धुळे जिल्हा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असून, येथील शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कोकण आणि नाशिक विभाग वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक विभागात 21 लाख 83 हेक्टर लागवड क्षेत्र असून आपर्यंत 15 लाख 90 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. नाशिक विभाग सर्वाधिक मका, बाजरी, सोयाबीन, नागली व भाताचे लागवड क्षेत्र आहे.

काही ठिकाणी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला असून, कृषि विभागामार्फत सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी संचालकांनी सांगितले. यासंदर्भात शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन होत आहे. तसेच बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी संचालक रमेश भताने यांनी दिली.

नाशिक विभागात पडलेला सरासरी पाऊस
नाशिक जिल्हा 84.11 मिलिमीटर
धुळे जिल्हा 8.21 मिलिमीटर
नंदुरबार जिल्हा 71.81 मिलिमीटर
जळगांव जिल्हा 78.49 मिलिमीटर
एकूण सरासरी पाऊस 78.75 मिलिमीटर

खरीप हंगामात झालेल्या पिकांचे पेरणी क्षेत्र
भात 706. 32 हेक्टर
बाजारी 1535.05 हेक्टर
नागली 302.78 हेक्टर
सोयाबीन 593.47 हेक्टर
कापूस 455.21 हेक्टर
मका 1436.47 हेक्टर

Intro:नाशिक विभागातील बळीराजा सुखावला,73 टक्के पेरण्या पूर्ण..

Body:नाशिक विभागात बऱ्या पैकी पाऊस झाल्याने शेतात 73 टक्के पेरण्या पूर्ण झाला असून, ह्या मुळे काही प्रमाणात का होईना बळीराजा सुखावला आहे,

कोकण आणि नाशिक विभाग वगळता,महाराष्ट्राच्या इतर भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे..पावसासाठी मराठवाड्यात सरकार कुत्रीम पाऊस पडण्याच्या तयारीत आहे..यंदाच्या वर्षी जून आणि जुलै महिन्यात नाशिक विभागात सरासरी 211 मिलिमीटर पाऊसा पैकी 178 मिलिमीटर पाऊस झाला आहे,नाशिक,धुळे,नंदुरबार आणि जळगाव भागात 73 टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..मात्र धुळे जिल्हा सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली असून येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत,

नाशिक विभागात 21 लाख 83 हेक्टर लागवड क्षेत्र असून,आता पर्यँत 15 लाख 90 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.नाशिक विभाग सर्वाधिक मका,बाजरी,सोयाबीन,नागली,भाताचं लागवड क्षेत्र आहे,

#नाशिक विभागात आता पर्यँत झालेला सरासरी पाऊस
नाशिक जिल्हा 84.11 मिलिमीटर
धुळे जिल्हा 8.21 मिलिमीटर
नंदुरबार जिल्हा 71.81 मिलिमीटर
जळगांव जिल्हा 78.49 मिलिमीटर
एकूण सरासरी पाऊस 78.75 मिलिमीटर

#नाशिक विभागात खरीप हंगामात आता पर्यत झालेल्या प्रमूख पिकांची पेरणी क्षेत्र...
भात 706. 32 हेक्टर
बाजारी 1535.05 हेक्टर
नागली 302.78 हेक्टर
सोयाबीन 593.47 हेक्टर
कापूस 455.21 हेक्टर
मका 1436.47 हेक्टर

काही ठिकाणी मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला असून,त्याबाबत कृषि विभागा मार्फत सर्वेक्षण सुरू,शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जातं आहे,तसेच बियाणे आणि खतांचा मागील वर्षीचा आणि ह्या वर्षीचा मुबलक साठा असल्याची माहिती कृषी संचालक रमेश भताने यांनी दिली

बाईट रमेश भताने कृषी संचाकल नाशिक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.