नाशिक : जिल्ह्यातील नानावली भागतील द्वारकापुरम सोसायटी समोरील नानावली रस्त्याच्या कडेला सहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. सोमवारी दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. द्वारकापुरम सोसायटीतील रहिवासी शहजाद शेख तरुण नानावली रस्त्याने दूध बाजारात जात असताना त्यास मृतदेह आढळून आला.भद्रकाली पोलिसांना त्यांने माहिती दिली. यानंतर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी भेट दिली. मृतदेह कुजलेल्या आणि दोन हात, एक पाय आणि शीर नसलेल्या अवस्थेत मृतदेह होता. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शवविच्छेदनात कारण स्पष्ट होईल : रस्त्याला लागूनच काही अंतरावर स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी लहान मुलांचे मृतदेह पुरले जाते. कुत्रा किंवा अन्य जनावरांनी तेथून मृतदेह आणला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राथमिक दर्शनी घातपाताचा प्रकार नसून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले. तसेच मृतदेहाची अवस्था बघता नरबळीचा प्रकार असल्याची परिसरातील नागरिकांनी शक्यता व्यक्त केली. शिवाय रविवार (ता.९) रात्रीतून हा मृतदेह येथे टाकण्यात आला असावा अशीही शक्यता वर्तवण्यात आली. पोलीस मात्र सर्व बाबींची शक्यता तपासून पाहत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार : अंदाजे सहा ते सात महिन्यांच्या बलिकेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला आहे. प्रथमदर्शी घातपाताचा प्रकार वाटत नाही, मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यावर नेमका प्रकार काय आहे हे स्पष्ट होईल. तसेच हा मृतदेह कोणी आणून टाकला हे तपासण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असल्याचे पोलीस उपआयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले.