ETV Bharat / state

गंगापुरचा 'कोरडा गुरूवार' संपला गंगापूर धरणात 53 टक्के पाणी - 53 percent water in Gangapur Dam

गंगापूर धरणात मागील जून महिन्यात पाणीसाठा केवळ 20 टक्के होता. मात्र गेल्या काही दिवसात समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात 53 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

गंगापुरचा 'कोरडा गुरूवार' संपला गंगापुर धरणात 53 टक्के पाणी
author img

By

Published : Jul 16, 2019, 8:32 AM IST

नाशिक- गंगापूर धरणात मागील जून महिन्यात पाणीसाठा केवळ 20 टक्के होता. मात्र, गेल्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस पडला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणात 53 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने पाणी कपात अंशत: कमी केली आहे. याआधी दर गुरूवारी संपूर्ण शहरात पाणी पुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपूर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.

गंगापुरचा 'कोरडा गुरूवार' संपला गंगापुर धरणात 53 टक्के पाणी

शहरात गेल्या 30 जूनपासून सर्व विभागात एकच वेळ पाणी पुरवठा करण्यात येत होता. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागात दोन वेळा पाणी पुरवठा होत होता. तो एकवेळ करण्यात आला होता. पावसाने ओढ दिल्याने दर गुरूवारी कोरडा दिवस पाळून पाणी पुरवठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभीपासून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढून ५३ टक्के झाला आहे. त्यामुळे पाणी कपात अंशत: रद्द करण्यात आली आहे. महापालिकेत आज आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानस यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या वेळी, हा निर्णय घेण्यात आला.

Intro:गंगापूर धरणातपाणी मागील जुन महिन्यात धरणातील पाणि साठा अवघे 20 टक्के होता मात्र येत्या काहि दिवसात समाधानकारक पाऊस पडल्याने गंगापूर धरणात 53 टक्या येवढि पाणिसाठ्यात वाढ झाल्याने महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला असल्याच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सागितलय

Body:महापालिकेत आज आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानस यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आलाConclusion:शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागात दोन वेळा पाणी पुरवठा होतो तो एकवेळ करण्यात आला. त्याच प्रमाणे पावसाने ओढ दिल्यानंतर दर गुरूवारी कोरडा दिवस पाळुन पाणी पुरवठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभी पासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणातील ५३ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे पाणी कपात अंशत: रद्द करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.