ETV Bharat / state

नाशिक म्युझिकल स्कूलसाठी सलग ५० तासांचे बँडवादन

या उपक्रमात विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी एमएच १५ बँड ग्रुपकडून बिट थेरिपी, ओपन माईक, गरभा नाईट कार्यक्रम तसेच शहरातील २०० ड्रमर्स विनेशला वेळी-वेळी साथ देत आहेत.

author img

By

Published : May 25, 2019, 9:42 PM IST

नाशिक - आदिवासी मुलांसाठी म्युझिकल स्कुल सुरू करण्यासाठी नाशिकच्या विनेश नायर हा कलाकार सलग ५० तास बँडवादन करत आहे. त्याच्या उपक्रमात एमएच १५ बँड ग्रुपच्या सदस्यांची मदत होत आहे. विनेशच्या आर्थिक मदतीसाठी हा संघ पुढे येत आहे.

नाशिक म्युझिकल स्कूलसाठी सलग ५० तासांचे बँडवादन

आदिवासी मुलांनी शालेय शिक्षणासोबतच संगीत क्षेत्रात ही पुढे जावे, यासाठी म्युझिकल स्कूल स्थापन करण्यात येणार, यासाठी नाशिककरांनी देखील मदत करावी, यासाठी विनेश नायर या कलाकाराने नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये सलग ५० तास बँडवादन सुरू केले आहे. आदिवासी मुलांसाठी विनेशने घेतलेल्या पुढाकाराला नाशिककर देखील मोठा प्रतिसाद देत आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. २४ एप्रिल सायंकाळी 5 वाजेपासून विनेशने बँड वादनास सुरुवात केली आहे. २५ एप्रिल सायंकाळी ७ वाजेपर्यंत तो सलग ५० तास बँड वादन करणार आहे.

या उपक्रमात विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी एमएच १५ बँड ग्रुपकडून बिट थेरिपी, ओपन माईक, गरभा नाईट कार्यक्रम तसेच शहरातील २०० ड्रमर्स विनेशला वेळी-वेळी साथ देत आहेत.
यावेळी विविध सामाजिक संघटनादेखील विनेशच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. नाशिकमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या डब्लूओडब्लू ग्रुपने आदिवासी मुलांसाठी म्युझिकल स्कूल सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे डब्लूओडब्लू ग्रुपच्या संस्थापिका अश्विनी न्याहाराकर यांनी सांगितले.
याआधी विनेश नायर याने आदिवासी मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी २०१४ मध्ये १६ तास तर २०१८ मध्ये तब्बल ३० तास सलग बँडवादन केले आहे. त्याच्या या सामाजिक उपक्रमात कलाकार राहुल अंबेकर, गणेश जाधव, नयन देवरे, सनी बाग, गौरव गौरी, यश कदम आदींचे सहकार्य मिळत आहे.

Intro:आदिवासी मुलांच्या म्युझिकल स्कुल साठी विनेश नायर चे 50 तासांचे सलग बँड वादन...

Body:आदिवासी मुलांनसाठी म्युझिकल स्कुल सुरू करण्यासाठी नाशिकच्या विनेश नायर हा कलाकार सलग 50 तास बँड वादन करत आहे..त्यांच्या ह्या उपक्रमात एम एच 15 बँड ग्रुपच्या सदस्यांची मदत होत असून नाशिककर देशील विनेशला चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येत आहे..

आदिवासी मुलांनी शालेय शिक्षणा सोबतचं संगीत क्षेत्रात ही पुढे जावे ह्या साठी म्युझिकल स्कुल स्थापन करण्यात येणार,ह्या साठी नाशिककरांनी देखील मदत करावी ह्यासाठी विनेश नायर ह्या कलाकाराने नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मध्ये सलग 50 तास बँड वादन सुरू केलं आहे..आदिवासी मुलांना साठी विनेशने घेतलेल्या पुढाकाराला नाशिककर देखील मोठा प्रतिसाद देत आर्थिक मदती साठी पुढे येत आहे..24 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपासून विनेश ने बँड वादनास सुरवात केली असून 25 एप्रिल सायंकाळी 7 वाजेपर्यंत तो सलग 50 तास बँड वादन करणार आहे..ह्यात उपक्रमात विनेशला प्रोत्साहन देण्यासाठी एम एच 15 बँड ग्रुप कडून बिट थेरिपी,ओपन माईक,गरभा नाइट कार्यक्रम तसेच शहरातील 200 ड्रमर्स विनेश वेळी वेळी साथ देत आहे.
यावेळी विविध सामाजिक संघटनी देखील विनेशच्या मदती साठी पुढे सरसावल्या आहेत,नाशिक मध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या wow ग्रुप ने आदिवासी मुलांसाठी म्युझिकल स्कुल सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आश्वास दिलं असल्याचे wow ग्रुपच्या संस्थापिका अश्विनी न्याहाराकर यांनी सांगितलं.

ह्या आधी विनेश नायर याने आदिवासी मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी 2014 मध्ये 16 तास तर 2018 मध्ये तब्बल 30 तास सलग बँड वंदन केलं आहे..
त्याच्या ह्या सामाजिक उपक्रमात कलाकार राहुल अंबेकर, गणेश जाधव,नयन देवरे,सनी बाग,गौरव गौरी,यश कदम आदींचे सहकार्य मिळतं आहे...
बाईट
राहुल आंबेकर कलाकार
अश्विनी न्याहाराकर wow ग्रुपच्या संस्थापिका

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.