ETV Bharat / state

नाशिकमध्ये भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पाच जण गंभीर - Nashik Crime News

शेतीकामासाठी भवर कुटुंबातील नऊ जण शेतात कामासाठी चालले होते. याच वेळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रॅक्टर विंचूर प्रकाश मार्गावर असलेल्या भावडबारी घाटाजवळ आला. ट्रॅक्टर देवळयाकडे निघाला असताना घाटातील अखेरच्या अपघाती वळणावर ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर उलटला.

7504036_thumbnail_3x2_d.jpg
नाशिकमध्ये भावडबारी घाटात ट्रॅक्टर उलटला
author img

By

Published : Jun 6, 2020, 5:28 PM IST

Updated : Jun 6, 2020, 5:47 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील देवळा गावाजवळील भावडबारी घाटातील वळणावर ट्रॅक्टर उलटल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील असून या घटनेत पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मालेगाव आणि देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील पुरी गावातील मधुकर भवर यांनी देवळा तालुक्यात शेती घेतली आहे. शेतीकामासाठी भवर कुटुंबातील नऊ जण शेतात कामासाठी चालले होते. याच वेळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा ट्रॅक्टर विंचूर प्रकाश मार्गावर असलेल्या भावडबारी घाटाजवळ आला. ट्रॅक्टर देवळयाकडे निघाला असताना घाटातील अखेरच्या अपघाती वळणावर ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्यावर उलटला.

घाटातील उतारामुळे ट्रॅक्टर भरधाव वेगात असल्याने ट्रॅक्टरचा चुराडा झाला. यावेळी ट्रॅक्टरखाली सापडून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा मालेगाव रुग्णालयात, तर दुसऱ्याचा देवळा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अपघातात मधुकर भवर, सुनिता विजय भवर, लहान मुलगा सोन्या विजय भवर, भाऊसाहेब काळे, विजय भवर यांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव आणि देवळा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Last Updated : Jun 6, 2020, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.