ETV Bharat / state

नाशकातून धावली लालपरी, पहिल्या दिवशी एसटी बसला प्रवाशांचा 45 टक्के प्रतिसाद - नाशिक एसटी बस बातमी

कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांनंतर एसडी महामंडळची आंतरजिल्हा बस सेवा आसपासून सुरू झाली. मात्र, प्रवाशांचा केवळ 45 टक्के प्रतिसाद मिळाला.

एसटी बस
एसटी बस
author img

By

Published : Aug 20, 2020, 5:12 PM IST

नाशिक - कोरोनामुळे मागील पाच महिन्यांपासून बंद असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बस सेवा आजपासून (दि. 20 ऑगस्ट) सुरू झाली. पहिल्या दिवशी सुरू झालेल्या बस सेवेला प्रवाशांनी 45 टक्के प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

नाशिकातून धावली लालपरी
शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील नऊ आगारांतून तात्पुरत्या स्वरूपात सुरू असलेल्या बस सेवा सुरू असून याच बरोबर नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक, महामार्ग बस स्थानकातून नाशिक-बोरोवली, नाशिक-पुणे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-धुळे, नाशिक-कसारा आदी ठिकाणी नाशिकहून बस मार्गस्थ झाले. मात्र, आजच्या पहिल्या दिवशी प्रवाशांनी बस सेवेला 45 टक्के प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रति बस 50 टक्के आरक्षण म्हणजे 22 प्रवाशांना घेऊन वाहतूक केली जाणार आहे. मात्र, असले तरी पहिल्या दिवशी प्रत्येक बसमधून 12 ते 15 प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बसचा प्रवास करताना कुठल्याच ई-पास अथवा परवानगीची आवश्यकता नसणार आहे.
बस प्रवासाला निघण्यापूर्वी केली जाते निर्जंतुकीकरण..
नाशिक बस आगारातून प्रत्येक बस मार्गस्थ होण्यापूरावी बसचे निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. त्यामुळे बसमध्ये प्रवास करताना प्रवाशांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.