ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास २५ ते ५० लाखांचा निधी; नरहरी झिरवाळ यांची घोषणा - Nashik Grampanchayat Elections

यामध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला 25 लाख रुपये, तर 5 हजाराच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांना 50 लाख रुपयांचा विकासनिधी गाव मागेल त्या कामासाठी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी दिली.

25 to 50 lakh fund if Gram Panchayat elections are held without any objection; Announces Narhari Jirwale
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास २५ ते ५० लाखांचा निधी; नरहरी झिरवळ यांची घोषणा
author img

By

Published : Dec 28, 2020, 2:13 AM IST

दिंडोरी (नाशिक) : १५ जानेवारीला महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. गावातील या निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या वापरल्या जात आहेत. राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही अशीच एक युक्ती वापरली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील जी गावे ही निवडणूक बिनविरोध पार पाडतील, त्यांना विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणा झिरवाळ यांनी केली आहे.

गावांसाठी लोकसंख्येनुसार पॅकेजेस..

दिंडोरी तालुक्यातील एकूण 60 ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होत आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामस्थ एकत्र येत बिनविरोध करतील, त्या ग्रामपंचायतीला एक महिन्याच्या आत गावाचा विकासासाठी आमदार निधीतून पैसे देण्यात येणार आहेत. यामध्ये पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावाला 25 लाख रुपये, तर 5 हजाराच्या पुढे लोकसंख्या असलेल्या गावांना 50 लाख रुपयांचा विकासनिधी गाव मागेल त्या कामासाठी देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी दिली.

झिरवाळ यांचे आवाहन..

तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावांत एकोपा असावा. तसेच, गाव पातळीवर ग्रामस्थांनी पक्ष भेद विसरून, गट-तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. दिंडोरी तालुक्यात येत्या १५ जानेवारीला एकूण ६० ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ४ जानेवारी ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख असून, तत्पूर्वी ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.