नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगात होत आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 254 नवे रुग्ण आढळले तर 6 जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 312 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 569 झाली आहे. यातील 4 हजार 47 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात मागील 24 तासात 254 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 166 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहेत. तर ग्रामीण भागात 74 रुग्णांची नोंद झाली. मालेगावामध्ये कोरोनाचे 14 रुग्ण आढळले. नाशिक जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयांमध्ये 2 हजार 200 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या 24 तासात 577 नव्या संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल झाले आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 8 नागरिकांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यातील 19 हजार 619 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून पॉझिटिव्ह येणाऱ्यांची टक्केवारी 23.99 इतकी आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे मात्र, त्यांच्या प्रयत्नांना म्हणावे असे यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
मागील 24 तासात आढळलेले रुग्ण -
नाशिक ग्रामीण - 74
नाशिक मनपा - 166
मालेगाव मनपा - 14
नाशिक जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या -
नाशिक ग्रामीण - 66
नाशिक मनपा - 154
मालेगाव मनपा - 79
जिल्हाबाह्य - 13
एकूण - 312