ETV Bharat / state

इगतपुरी तालुक्यातील 18 वर्षीय तरुणीने घेतला गळफास; मोबाईलवर गाणे लावून संपवले जीवन - 18 वर्षीय तरुणी योगिता भोईर आत्महत्या

इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील मारुती भोईर हे पत्नीसह मोडाळे येथे रविवारी सकाळी गेले होते. घरी त्यांची मुलगी योगिता मारुती भोईर वय 18 ही एकटीच होती. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आईवडिलांनी योगिताला जेवायला बोलावले.

yogita bhoir
योगिता भोईर
author img

By

Published : Aug 23, 2021, 9:18 AM IST

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील एका 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वतःच्या घरातच गळफास लावून तिने जीवन संपवले. योगिता मारुती भोईर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मोबाईलवर स्पीकर ओपन करून गाणे ऐकता ऐकता केलेल्या ह्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

मोबाईलवर स्पीकर ओपन करून ऐकत होती गाणे -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील मारुती भोईर हे पत्नीसह मोडाळे येथे रविवारी सकाळी गेले होते. घरी त्यांची मुलगी योगिता मारुती भोईर वय 18 ही एकटीच होती. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास आईवडिलांनी योगिताला जेवायला बोलावले. मात्र, तिचे उत्तर येत नसल्याने त्यांनी घरात जाऊन बघितल्यावर योगिताने गळफास लावल्याचे आढळून आले. याबाबत इगतपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली.

योगिताने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. विशेष म्हणजे योगिताने मोबाईलवर गाणे लावून जीवन संपवले असल्याचे समजते. योगिताला 2 मोठ्या बहिणी असून ही सर्वात लहान होती. तसेच एकच भाऊ असून ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी ही घटना घडल्याने तळेगाव भागात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास इगतपुरी पोलीस करत आहे.

हेही वाचा - रक्षाबंधन : जो राखीचे संरक्षण करू शकला नाही, तो बहिणीचे काय संरक्षण करणार? अशीही एक स्पर्धा, जिथे मेहुणी-वहिणी राखी...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.