ETV Bharat / state

Neo Metro Nashik: निओ मेट्रो प्रकल्पाला राज्य शासन स्वनिधीतून देणार 1100 कोटी - Neo Metro

तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये 31 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारून त्यावर देशातील पहिली टायरबेस मेट्रो आणण्याचे जाहीर केले होते. प्रकल्पासाठी केंद्र शासनाने 2 हजार कोटींची तरतूद करूनही चार वर्षानंतर हालचाली होत नसल्याने फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे पत्र पाठवून निओ मेट्रो प्रकल्प लवकर मंजूर करा, मात्र तोपर्यंत राज्य शासनाच्या निधीतून नाशिक रोड ते सीबीएस असा प्रायोगिक तत्त्वावर 10.44 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यासाठी मंजुरी द्या, असे साकडे घातले आहे. त्यासाठी राज्य शासनाने स्वनिधीतून 1100 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली.

Neo Metro Nashik
निओ मेट्रो नाशिक
author img

By

Published : Apr 26, 2023, 12:13 PM IST

नाशिक : 2017 मधील नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मी नाशिक दत्तक घेत आहे. विधानसभा निवडणुकी वेळी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकला निओ मेट्रो प्रकल्प उभारण्याचे जाहीर केले होते. 2020 मध्ये केंद्र अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद केली, मात्र त्यानंतर हा प्रकल्प केंद्र शासनाकडे फाईल बंद आहे. नाशिकमध्ये मार्च महिन्यात झालेल्या भाजपाच्या प्रदेश बैठकीत फडणवीस यांनी लवकरच या प्रकल्पाचा निर्णय होईल, असे म्हटले होते.

प्रायोगिक तत्त्वावर टायरबेस मेट्रो प्रकल्प : मात्र केंद्र सरकारकडून कोणताही आशेचा किरण दिसत नाही. त्यामुळे तोपर्यंत नाशिक रोड ते सीबीएस दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर टायरबेस मेट्रो प्रकल्प सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र त्या अगोदर राज्य शासनाने स्वनिधीतून 1100 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भाजपाच्या जीवात जीव आला आहे.

पहिल्या टप्प्यातील नवीन मार्ग : सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका, गांधीनगर नेहरूनगर, दत्तमंदिर, नाशिक रोड या 10.44 किलोमीटर अंतरावर प्रायोगिक तत्त्वावर टायरबेस मेट्रो चालवण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. यासाठी अकराशे कोटी रुपयांच्या खर्च राज्य शासन करणार आहे. जुन्या प्रस्तावानुसार निओ मेट्रोसाठी दोन एलीवेन्टेड कॉरिडोर उभारले जाणार आहेत. सरकारच्या स्मार्ट सिटी करण्याच्या यादीत देशातील 100 शहरांमध्ये नाशिकचा समावेश आहे.

निओ मेट्रोसाठी दोन एलीवेन्टेड कॉरिडोर : यात पहिला कॉरिडोर दहा किलोमीटरचा आहे. त्यात गंगापूर, जलालपूर, गणपती नगर, काळे नगर, जिहान सर्कल, थत्ते नगर, शिवाजीनगर, पंचवटी सीबीएस, मुंबई नाका अशी दहा स्थानके समाविष्ट असतील. दुसरा कॉरिडोर गंगापूर ते नाशिक रोड असा 22 किलोमीटरचा आहे. त्यात गंगापूर गाव, शिवाजीनगर, श्रमिक नगर, एमआयडीसी मायको सर्कल, सीबीएस, सारडा सर्कल, द्वारका गांधीनगर, नेहरूनगर, दत्त मंदिर, नाशिक रोड अशी स्थानके आहेत.

हेही वाचा : निओ मेट्रोने नाशिक होणार स्मार्ट, 2023 पर्यंत प्रकल्प होणार पूर्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.