ETV Bharat / state

आदिवासी भागात लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी सोंगाड्यांचा प्रभाव

आदिवासी बहुल भागात नागरिकांमध्ये मनोरंजनाची सर्वात लोकप्रिय लोककला म्हणून सोंगाड्यांची ओळख आहे. याचा वापर करत आता लसीकरणाबाबतची जनजागृती केली जात आहे.

awareness about corona vaccination
सोंगाड्यांचा लसीकरण जनजागृतीसाठी वापर
author img

By

Published : Jun 17, 2021, 5:41 PM IST

Updated : Jun 17, 2021, 6:43 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात लसीकरणाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आदिवासी बहुल भागात नागरिकांमध्ये मनोरंजनाची सर्वात लोकप्रिय लोककला म्हणून सोंगाड्यांची ओळख आहे. सोंगाड्याची हीच लोकप्रियता ध्यानाता घेत प्रशासनाने सोंगाड्याच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.

माहिती देताना सोंगाड्या कलावंत
  • आदिवासी बांधवांमध्ये लसीकरणासाठी सोंगाड्यांकडून जनजागृती -

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये लसीकरणाबाबत विविध अफवांना ऊत आला होता. ते दूर करण्यासाठी आदिवासी बोलीभाषेतील गीतावर आदिवासी महिलांचा पेहराव करुन लोकमनोरंजन सादर करणारे हे पुरुष मंडळी आहेत. सोंगाड्या पार्टी लयबद्ध पद्धतीने नाच करतात. खास महिला आवाज काढून गाणं म्हणण्याची ही पद्धत आणि दोन गाण्यांच्यामध्ये स्थानिक आदिवासी बोली भाषेतून लोकांना हसतखेळत ठेवण्याचे काम सोंगाड्या करतात. त्यामुळे गेली अनेक दशक आदिवासी बांधवांच्या मनावर सोंगाड्या पार्टी अधिराज्य गाजवत आहे. कार्यक्रमात गर्दी खेचायची आणि रंग भरण्याची सोंगाड्या पार्टीची हीच कला पाहून सध्या शासनाने सोंगाड्यांच्या मदतीतून आदिवासी बहुल खेड्यापाड्यात कोरोणा लसीकरणाचे काम सुरू केले. या सोंगाड्या पार्टी रोज कुठल्यातरी गावात जातात तिथे तीन ते चार तास सोंगाड्यांचे काम करत कोरोना लसीकरणाची जनजागृती देखील करत आहेत.

  • आदिवासी भागांमध्ये सोंगाड्या पार्टीने केले नागरिकांना आकर्षित

नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेल्या अफवा आणि गैरसमज पाहता लसीकरणाचा टक्का वाढवणे प्रशासनासमोर मोठे जिकरीचे काम होते. मात्र, ज्या गावात सोंगाड्यांच्या कार्यक्रम होतात त्या गाव पाड्यांवर लसीकरणाचे प्रमाण वाढत असल्याचा दावा देखील सोंगाड्या पार्टींकडून केला जात आहे. सोंगाड्या गावात लसीकरणाबाबत जनजागृती करत असताना परिसरातील ग्रामस्थांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

  • विविध योजनांची सोंगाड्या पार्टीकडून माहिती -

शासनाच्या हगणदारीमुक्त गाव असो वा पोलीओ लसीकरण अथवा कुपोषणाच्या बाबतची जनजागृती या कामी स्थानिक सोंगाड्या पार्टी नेहमीच अग्रेंसर राहिल्या आहेत. प्रशासनाच्या मदतीने त्यांनी अनेक जनजागृती कार्यक्रमही केले. मात्र आता कोरोना काळात खऱ्या अर्थाने याच सोंगाड्यातील लोककलावंतांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळेच शासनाच्या विविध योजनांना जनजागृती देणाऱ्या या सोंगाड्या पार्टीतील कलावंतांना शासन स्तरावरुन मदतीस हातभार लावण्याची मागणी देखील सोंगाड्यांकडून होत आहे.

Last Updated : Jun 17, 2021, 6:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.