ETV Bharat / state

Uday Samant On Maratha Reservation : सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार - मंत्री उदय सामंत - उदय सामंत मराठा आरक्षणावर बोलताना

Uday Samant On Maratha Reservation : महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत (Industry Minister Uday Samant) यांनी नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाबाबत म्हणाले की, (Uday Samant) विरोधक कितीही काहीही आरोप करत असले तरी आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली आहे. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Uday Samant On Maratha Reservation
मंत्री उदय सामंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2023, 7:41 PM IST

मंत्री उदय सामंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना

नंदुरबार : Uday Samant On Maratha Reservation : नंदुरबार येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना ते बोलत होते. (Maratha Reservation Issue) यापुढे मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारकडून काम सुरू असून समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले. मात्र, दुर्दैवाने सर्वोच्य न्यायालयात आरक्षण टिकू शकले नाही. ते का? कोणामुळे यावर मात्र, मंत्री सामंत यांनी बोलणे टाळले.

तरुणांनी टोकाची पावले उचलू नयेत : मराठा समाजातील तरुणांनी टोकाची पावले उचलू नयेत, असे आवाहन देखील मंत्री सामंत यांनी केले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस राज्याचे अकार्यक्षम गृहमंत्री असल्याची टीका विरोधकांकडून होत असल्याने यावर वाजे प्रकरणाचा उल्लेख करत सडेतोड उत्तर देत सामंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच चुकीला माफी नाही. आरोपींना पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांना कायदेशीर नोटिसा पाठवल्या : ललित पाटील प्रकरणात विरोधकांकडून आरोप केले जातात. मात्र, जोरात बोलून खोटं सत्यात बसवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. ज्या मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहे त्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आल्या आहेत. तर विरोधकांकडे ललित पाटील प्रकरणाची मोठ्या प्रमाणात माहिती असून त्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आरोप करणाऱ्यांनी याचेही उत्तर द्यावे की, सचिन वाजे हा कुणाचा होता आणि त्याच्या माध्यमातून वसुली फोन करत होते, असाही प्रश्न त्यावेळेस त्यांनी उपस्थित केला आहे.

गुजरात आणि आसाममधूनही उद्योग येताहेत : महाराष्ट्रातून बाहेर राज्यात उद्योग जात असून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात होते. मात्र राज्यात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून गुजरात आणि आसाम मधूनही उद्योग राज्यात येत आहेत. या गोष्टी राज्यातील विरोधकांना दिसत नाहीत का? असाही प्रश्न यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत त्यांनी उपस्थित केला.

विरोधकांकडून वेळकाढूपणा : आमदार अपात्रतेच्या संदर्भात वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, अपात्रतेच्या सुनावणी वेळेस फिजिशन कोणी दाखल केले? सुनावणी कोणामुळे लांबणीवर पडली आहे? हे राज्यातील सर्वे जनतेला माहिती आहे. वेळ कोणी मागून घेतला, सर्व सुनावण्या एकत्र घेण्याची मागणी कोणी केली. हे जनतेला माहीत असून अध्यक्ष योग्य पद्धतीने काम करत असल्याचे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

  1. Devendra Fadnavis : ड्रग्स माफियाला कोणाचा पाठिंबा? ललित पाटील प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
  2. Sunil Kawale Funeral : सुनील कावळे यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या आमदाराला मराठा समाजानं दाखवला घरचा रस्ता; पाहा व्हिडिओ
  3. Sanjay Raut On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूची माणसं नशेच्या बाजारात, आमदारांना मिळतोय लाखोंचा हप्ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.