ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात 25 कोरोनाबाधित वाढले; एकूण संख्या 312 वर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 312 वर पोहोचला आहे. त्यापैकी 190 कोरोनामुक्त झाले असून 107 रूग्ण उपचार घेत आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

Nandurbar Corona Update
नंदुरबार कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 16, 2020, 1:44 PM IST

नंदुरबार- जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून नंदुरबार शहर हॉटस्पॉट बनले आहे. बुधवारी तब्बल 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. नंदुरबार शहरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. तर शहादा तालुक्यातील पुसनद गावातही कोरोनाने शिरकाव केला असून 8 वर्षीय बालिकेला लागण झाली आहे. यात एका खाजगी डॉक्टरासह भाजीपाला विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या नंदुरबार येथील तुलसी विहारातील 75 वर्षीय वृध्दाचा उपचादरम्यान मृत्यू झाला असून मृतांची संख्या 15 झाली आहे. यामुळे नंदुरबार शहर हॉटस्पॉट बनत असून जिल्ह्यात बाधितांची संख्या 312 वर पोहोचली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून नंदुरबार शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वाधिक रूग्ण शहरात आढळून येत आहेत.

25 रुग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण नंदुरबार शहरातील आहेत. नंदुरबार येथील कोकणी हिलमधील 49 वर्षीय महिला, श्रॉफ हायस्कूलजवळील 33 वर्षीय महिला, रायसिंगपुर्‍यात 40 वर्षीय महिला, पायल नगरात 62 वर्षीय महिला व 70 वर्षीय वृध्द पुरूष, नंदुरबार येथील मोठा माळीवाड्यात 39 वर्षीय पुरूष, पटेलवाडीत 43 वर्षीय पुरूष, गिरीविहार सोसायटीत 78 वर्षीय दोन पुरूष वृध्द, सरस्वती नगरात 60 वर्षीय पुरूष, राजीव गांधी नगरात 21 वर्षीय युवती, 24 वर्षीय युवक, 21 वर्षीय युवक, रघुवंशी नगरात 25 वर्षीय युवक आणि लोकमान्य कॉलनीत 47 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तळोदा येथील सुमन नगरात 37 वर्षीय पुरूष, तळोदा येथील माळीवाड्यात 21 वर्षीय युवक आणि शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत 76 वर्षीय पुरूष व 20 वर्षीय युवक, गांधीनगरात 53 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळले आहेत.

शहादा तालुक्यातील मंदाण्यात एक व्यक्ती, म्हसावद रस्त्यालगत 23 वर्षीय युवती, शहादा वृंदावन नगरात 27 वर्षीय युवती तर शहादा तालुक्यातील पुसनद गावात 8 वर्षीय बालिकेला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शहादा तालुक्यातील 25 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे सोनवद व पुसनद गावातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे बुधवारी कोरोनाचे तब्बल 25 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात नंदुरबार शहरात 15, तळोद्यातील 2 तर शहादा शहर व तालुक्यात 8 असे रूग्ण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आले आहेत.

या बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीकडून सदर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे. तसेच रुग्ण राहत असलेल्या परिसराला प्रशासनाने कंटेंटमेंट झोन जाहीर केले आहे.

दरम्यान, दोन दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा संख्या 15 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 312 वर पोहोचला आहे. त्यापैकी 190 कोरोनामुक्त झाले असून 107 रूग्ण उपचार घेत आहेत. या बाधित रुग्णांमध्ये सद्यस्थितीत नंदुरबार शहरातील तब्बल 76 रुग्ण, शहाद्यातील 25, तळोद्यातील 2, नवापूरातील 1, अक्कलकुव्यातील 2, धडगांव येथील 1 असे एकुण 107 रुग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. नंदुरबार शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून नागरिकांना अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

11 जणांची कोरोनावर मात

नंदुरबार जिल्ह्यातील 11 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. संसर्गमुक्त झाल्याने या 11 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील घोडापीर मोहल्ला भागातील 1 व्यक्ती, खंडेलवाल नगरातील 1 व्यक्ती, जिल्हा रूग्णालयातील 1 व्यक्ती, नवापूर येथील जनतापार्क येथील 1 व्यक्ती, शहादा येथील जिजाऊ नगरातील 1 व्यक्ती तर शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील 5 व्यक्ती संसर्गमुक्त झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.