ETV Bharat / state

वाळूने भरलेला भरधाव डंपर थेट शिरला घरात; दोन ठार, एक जखमी

नांदरखेडा गावाजवळ बंजारा समाजाच्या वस्तीतील घरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपर शिरल्याने झोपेत असलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सकाळी दहाला बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी रास्तारोको करून रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी समजूत काढून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको मागे घेण्यात आला.

Nandurbar truck accident
वाळूचा भरधाव डंपर थेट शिरला घरात; दोन ठार, एक जखमी
author img

By

Published : Oct 14, 2020, 3:01 PM IST

नंदुरबार - साक्री रस्त्यावरील जिल्हा कारागृहाच्या पुढे असलेल्या नांदरखेडा गावाजवळ बंजारा समाजाच्या वस्तीतील घरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपर शिरल्याने झोपेत असलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत पावलेल्या युवकांची नावे प्रवीण राठोड आणि विक्रम श्रावण जाधव अशी आहेत. तर, दिनेश पावरा (१८) गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब झोपले असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूचा डंपरच्या ताबा सुटल्यामुळे हा डंपर त्यांच्या घरात शिरला. घराची मोडतोड करीत थेट हा डंपर घरात झोपलेल्या दोन युवकांवर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर डंपर चालक तेथून पळून गेला.

रात्रीच्या अंधारात या कुटुंबाने आरडाओरड करत मदतीसाठी आक्रोश केला, ज्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी नांदरखेडा गावापर्यंत पसरली. त्यानंतर नांदरखेडा गावातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच तातडीने पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेनंतर सकाळी परिसरातील बंजारा समाजातील नागरिकांच्या मोठा समुदाय घटनास्थळी जमला होता. त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांची समजूत काढली आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन देत कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले, त्यानंतर हा समुदाय शांत झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.