ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळून, एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी - akkalkuva

पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते; त्यामुळे वाहने हळूहळू मार्गक्रमण करत असताना अचानक झाड कोसळले.

राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळून एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले आहेत
author img

By

Published : Jul 5, 2019, 2:05 PM IST

नंदुरबार- अक्कलकुवा शहरातून गेलेल्या नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील(NH-७५३B) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील निलगिरीचे भलेमोठे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या बस, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांवर अचानक कोसळले. बसमधील प्रवासी सुखरूप आहेत मात्र, दुचाकीस्वार आणि पादचारी असे तीन जण गंभीर जखमी असून त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळून एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले आहेत

रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून नाहक बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आता अक्कलकुवा शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळून जीव गमावण्याची दुर्घटना घडली आहे.

पादचारी आणि दुचाकीस्वाराची गंभीर अवस्था असून जखमींची नावे राजू सुरुपसिंग पाडवी (वय ३२, रा. संजय नगर-अक्कलकुवा), रमेश सुंगु पाडवी (वय ३३ रा. मकरानी फळी), अंकिता विक्रम वळवी (वय 20 रा. राजमोही) या तिन्ही जखमींना तातडीने अक्कलकुवा येथे प्राथमीक उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु तिघांचीही गंभीर अवस्था गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार येथे घेऊन जाताना जखमी राजू सुरुपसिंग पाडवी यांची वाटेतच प्राणज्योत मावळली.

नेत्रांग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा होत्या पुलावरील दुरुस्तीनंतर हळूहळू वाहने मार्गक्रमण करत असताना अचानक झाड कोसळले.

Intro:Anchor :- अक्कलकुवा शहरातून गेलेल्या नेत्रंग - शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील निलगिरीचे भलेमोठे झाड रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बस, दुचाकीस्वार आणि पाद चाऱ्यांवर अचानक कोसळले. या घटनेत बसमधील प्रवासी सुखरूप आहेत मात्र बाइकस्वार आणि पादचारी असे तीन जण गंभीर जखमी झाले आहे. Body:राजू सुरुपसिंग पाडवी वय ३२ रा. संजय नगर-अक्कलकुवा, रमेश सुंगु पाडवी वय ३३ रा. मकरानी फळी, अंकिता विक्रम वळवी वय 20 रा. राजमोही तिन्ही जखमींची गंभीर अवस्था झाल्याने अक्कलकुवा येथे प्रथम उपचार घेऊन नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जात असताना राजू सुरुपसिंग पाडवी यांची प्राणज्योत रस्त्यात मावळली.Conclusion:नेत्रांग - शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबपर्यंत रांगा होत्या पुलावरील दुरुस्तीनंतर हळूहळू वाहने मार्गक्रमण करत असताना ही घटना घडली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.