नंदुरबार- विसरवाडीजवळ महामार्गावर वाहनांना ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रॅक्टरने समोरून येणार्या मालट्रकला धडक दिल्याने ट्रॅक्टर उलटून चालक जखमी झाला. या अपघातात वाहनाचे नुकसान झाले असून महामार्गावर काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. ही घटना धुळे-सुरत महामार्गावरील सोनखांब गावाजवळ घडली.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापूरहून पिंपळनेरकडे ट्रॅक्टर जात होता. यावेळी समोरील वाहनांना ओव्हरटेक करीत पुढे जाण्याच्या नादात भरधाव ट्रॅक्टरने धुळ्याकडून सुरतकडे जाणार्या मालट्रकला समोरुन धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचालक जखमी झाला असून वाहनाचेही नुकसान झाले आहे. अपघात घडताच महामार्गावर काही वेळ दोन्ही बाजुंनी वाहतुक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. ही दुर्घटना नवापूर तालुक्यातील विसरवाडीपासून 6 कि.मी. अंतरावर असलेल्या सोनखांब गावाजवळ घडली.
हेही वाचा-डिलिव्हरी बॉयला लुटणारी टोळी सीआयडीच्या जाळ्यात; यु-ट्युबद्वारे घेतले चोरीचे प्रशिक्षण
अपघातांची मालिका सुरूच..
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. तीन दिवसांपूर्वी देखील दोन वाहनांमध्ये धडक होवुन दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला फेकली गेली होती. त्यामुळे वाहनचालक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हैराण झाले असून संबंधित विभागाने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा-भरधाव वाहनासह ओमनी शेतात उलटली; सावरटजवळची घटना, पाच जखमी