ETV Bharat / state

भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने चालकाचा मृत्यू; खोलघर जवळील घटना - Nawapur taluka

ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दबून ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर उचलून युवकाचा मृतदेह बाहेर काढला.

ट्रॅ्क्टरचा अपघात
ट्रॅ्क्टरचा अपघात
author img

By

Published : Oct 30, 2020, 11:00 AM IST

नंदुरबार - भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने त्याखाली दबून ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाल्याची घटना खोलघर गावाजवळ घडली. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर उचलून युवकाचा मृतदेह बाहेर काढला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपुर येथील महेश गांगुर्डे हा तरुण ट्रॅक्टर घेवुन खडकी गावाकडे जात होता. नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील खोलघर गावाजवळील रस्त्यावर हा भरधाव ट्रॅक्टर उलटून अपघात झाला.

यावेळी रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यात ट्रॅक्टर पडल्याने त्याखाली दबून महेश गांगुर्डे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरखाली दबलेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.