ETV Bharat / state

नंदुरबारात जनावरांनाही दुष्काळाच्या झळा; चारा-पाण्यासाठी मेंढपाळांचे स्थलांतर - साक्री

शासनाच्या योजनांपासून वंचित असलेला ठेलारी समाज मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी दुष्काळात हतबल झाला आहे. निसर्गाचे चक्र असेच राहिले तर येत्या काळात ठेलारी समाजाला जगणे कठीण होईल. त्यामुळे या समाजासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलण्याची मागणी ठेलारी बांधवांनी केली आहे.

दुष्काळामुळे स्थलांतरीत झालेले मेंढपाळ
author img

By

Published : Jun 10, 2019, 12:44 PM IST

Updated : Jun 10, 2019, 8:39 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात दुष्काळाने कहर केला आहे. माणसांसोबतच जनावरांनाही दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे. त्यामुळे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन चारा आणि पाण्याच्या शोधात फिरत आहेत.

जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुंमली गावातील भटू सोनवणे आणि नाना गोयकर या मेंढपाळांनी चाऱ्यासाठी मेंढ्यांचा कळप घेऊन परिवारासह नवापूर तालुक्यातील केवडीपाडा गाव गाठले. मेंढपाळांनी या गावातील ईश्वर गावित यांच्या शेतातील भुईमूगचा चारा ८ हजार पाचशे रुपयाला विकत घेतला आहे, तर पाण्यासाठी ३ किलोमीटर लांब असलेल्या केवडीपाडा गावच्या धरणापर्यंत त्यांना पायपीट करावी लागत आहे. या शेतातला चारा संपत नाही तोपर्यंत ईश्वर गावित यांच्या शेतात त्यांचा थांबा असणार आहे. याठिकाणचा चारा संपल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघणार आहेत.

शासनाच्या योजनांपासून वंचित असलेला ठेलारी समाज मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी दुष्काळात हतबल झाला आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे मेंढपाळांचे जीवन कठीण होत चालले आहे. त्यांना परिवाराला घेऊन भरउन्हात चारा मिळेल तिथे उघड्यावर संसार मांडावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर अंधारात जमिनीवर झोपावे लागत आहे. तसेच मेंढ्यांसाठी रात्री जाळी लावून मेंढ्यांची राखण करावी लागते. उघड्यावरील या संसारामुळे लहान मुलांचे मात्र मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.

Intro:

Note :- या बातमीसाठी साठे सरांच्या मार्गदर्शनाखाली पॅकेज एडिट करून पाठवल आहे.

यंदाच्या दुष्काळात माणसांसोबत जनावरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे, मेंढपाळ लोकांना पाणी आणि चाऱ्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

मेंढया चारण्यासाठी ठेलारी लोकांना शेकडो किलोमीटर दूर प्रवास करत चारा आणि पाण्याचा शोध करावा लागत आहे धुळे जिल्ह्यातील काही ठेलारी लोक नंदुरबार जिल्ह्यात मेंढ्यांचा कळप घेऊन चारा आणि पाण्याच्या शोधात फिरत आहे परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे ठेलारी लोकांना आपल्या मेंढ्यांसाठी विकत चारा घेऊन खाऊ घालण्याची वेळ आली आहे.

Body:धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रुंमली गावातील भटू सोनवणे आणि नाना गोयकर या मेंढपाळांनी चाऱ्यासाठी मेंढ्यांचा कळप घेत परिवारासह नवापुर तालुक्यातील केवडीपाडा गाव गाठले आहे.

या गावातील ईश्वर गावित यांच्या शेतातील भुईमूगचा चारा आठ हजार पाचशे रुपयाला मेंढपाळांनी विकत घेतला आहे, तर पाण्यासाठी तीन किलोमीटर लांब असलेल्या केवडीपाडा गावच्या धरणात पाणी पाजायला जावे लागते. जोपर्यंत ह्या शेतातला चारा संपत नाही तोपर्यंत ईश्वर गावित यांच्या शेतात त्यांचा थांबा असणार आहे, इथला चारा संपल्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघणार.

मेंढपाळांचा हे जीवन दुष्काळी परिस्थितीमुळे कठीण होत चालले आहे, चारा आणि पाणी मिळत नसल्याने मेंढ्यांना कधी कधी उपाशी राहावं लागतं तसेच आपल्या परिवाराला घेऊन भरउन्हात चारा मिळेल तिथं उघड्यावर संसार मांडावा लागतो रात्रीच्या वेळी तर अंधारात जमिनीवर झोपावं लागतं तसेच मेंढ्यांसाठी रात्री जाळी लावून मेंढ्यांची राखण करावी लागते. उघड्यावरील या संस्कारामुळे लहान मुलांचे मात्र मोठे हाल होतात ठेलारी लोकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं.

Conclusion:शासनाच्या योजनांपासून वंचित असलेला ठेलारी समाज मेंढ्यांच्या चारा-पाण्यासाठी दुष्काळात हतबल झाला आहे, निसर्गाचे चक्र असच राहिलं तर येत्या काळात ठेलारी समाजाला जगणं कठीण होईल. त्यासाठी आमच्या समाजासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलावं अशी मागणी ठेलारी बांधवांनी केली आहे.
Last Updated : Jun 10, 2019, 8:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.