नंदुरबार - लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. ती आजपासून सुरू झाली आहेत. शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवून तसेच नियमांचे काटेकोर पालन करून मंदिरात प्रवेश दिला जात आहे.
राज्यात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानंतरच शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. आज संकष्ट चतुर्थी असल्यामुळे सकाळपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. योग्य 'फिजिकल डिस्टन्स' ठेवत, इतर काळजी घेत सकाळपासून दर्शन सुरू करण्यात आले.
मागील तीन महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आणि परिसर आता गजबजू लागली आहेत. मंदिराच्या बाहेर फुलविक्रेते आणि नारळविक्रेत्यांची दुकानेही आजपासून सुरू झाली आहेत. मंदिर पुन्हा उघडण्यात आल्याने फुल व नारळ विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा - नंदुरबारमध्ये प्रतिबंधित क्षेत्रामधील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू
हेही वाचा - आदिवासी विकास विभागाच्या खावटी अनुदान योजनेवर खा. डॉ हीना गावित यांचे प्रश्नचिन्ह