ETV Bharat / state

दुर्गम भागात 'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम; शिक्षकांचा पुढाकार - nandurbar education news

लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाला. यानंतर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडत असतानाही मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे द्यायचे कसे? हाच मोठा प्रश्न होता. मात्र विद्यार्थी हित जोपासणाऱ्या जि.प.शाळेतील एका शिक्षकाने अभिनव उपक्रम राबवत थेट 'शिक्षण आपल्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे.

nandurbar education news
दुर्गम भागात 'शिक्षण आपल्या दारी' उपक्रम; शिक्षकांचा पुढाकार
author img

By

Published : Aug 5, 2020, 12:27 PM IST

नंदुरबार - लॉकडाऊनमुळे रोजगार बंद झाला. यानंतर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडत असतानाही मुलांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे द्यायचे कसे? हाच मोठा प्रश्न होता. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल आणणार कुठून? आणलाच तर इंटरनेटची अडचण, अशा एक-ना-अनेक प्रश्नांनी नवापूर तालुक्यातील बोरवण येथे बांबूच्या टोपल्या विणण्याचे काम करणारे पालक हतबल झाले होते. मात्र विद्यार्थी हित जोपासणाऱ्या जि.प.शाळेतील एका शिक्षकाने अभिनव उपक्रम राबवत थेट 'शिक्षण आपल्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे.

सर्वात कमी मानव निर्देशांक नंदुरबार जिल्ह्याचा आहे. आदिवासी भागात दरडोई उत्पन्न कमी. त्यातच लॉकडाऊनमुळे रोजगाराच्या संधी घटल्या. जेमतेम तुटपुंज्या मजुरीवर उदरनिर्वाह करणारे पालक आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची इच्छा नसतानाही हतबल आहेत. कारण ऑनलाइन शिक्षण न परवडणारे. ज्या ठिकाणी मोबाइल नाही, मोबाइल असेल तर रेंज नाही. रेंज असेल तर इंटरनेट नाही. अशा ठिकाणच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणावे कसे असा मोठा प्रश्न पडला. मात्र बोरवणमध्ये नुकतेच रायगडमधून बदली झालेले शिक्षक दिलीप नरशी गावित यांनी सर्व प्रश्नांवर मात करत सोशल डिस्टन्स ठेऊन थेट शिक्षण मुलांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम हाती घेतला. पालकांना व विद्यार्थ्यांना घरी जाऊन मार्गदर्शन करण्यास त्यांनी सुरुवात केली.

नवापूर तालुक्यातील बोरवण येथे इ.१ ली ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. शाळेचा पट ३५ तर दोन शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सने गटागटाने अभ्यासाला बसवले. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षकाने ऑफलाइन शिक्षण देण्याची शक्कल लढवली. व्हॉट्सॲपवर आलेल्या व संगणकावर स्वत: तयार केलेल्या पीडीएफचे एक पुस्तक तयार करून स्वत: झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना वाटले. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र पेज घेवून त्यांना दररोज काय करतो, याची नोंदवही तयार करून नोंद ठेवली जाते. अशाप्रकारे शाळा बंद; पण शिक्षण सुरू आहे.

पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना वह्या, पेन व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप शिक्षकांनी स्वखर्चातून केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणसुद्धा दिले जात आहे. या शिक्षकांचा आदर्श घेऊन दुर्गम भागातील शिक्षक पुढे आल्यास त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.