ETV Bharat / state

Nandurbar Swabhimani Agitation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 'रस्तारोको' आंदोलन - Swabhimani Agitation In Nandurbar

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ( Swabhimani Agitation In Nandurbar ) बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर 'रास्ता रोको' ( Nandurbar Rasta Roko Agitation ) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

Nandurbar Swabhimani Agitation
Nandurbar Swabhimani Agitation
author img

By

Published : Mar 4, 2022, 7:59 PM IST

नंदुरबार - शेतकऱ्यांना १२ अखंडित वीजपुरवठा मिळावा, तसेच विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिली जाते, अशा विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ( Swabhimani Agitation In Nandurbar ) बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर 'रास्ता रोको' ( Nandurbar Rasta Roko Agitation ) आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी काही काळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.

विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांचे 'रास्ता रोको' आंदोलन -

विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभार आणि शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शहादा शहरातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख घनश्याम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रस्ता रोको आंदोलनामुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विविध मागण्या

विद्युत वितरण कंपनी खराब झालेले रोहित्र शेतकऱ्यांना बदलून देत नसल्याने रब्बी हंगामातील पिके धोक्यात आले आहेत. रोहित्र बदलून यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीचा मनमानी कारभार बंद करावा, अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले होते. याठिकाणी आक्रमक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा - Russia Ukraine War : 'मृत्यूनंतर चार्टर विमान पाठवल्याने काय फरक पडणार?'; युक्रेनमध्ये गोळी लागलेल्या भारतीय तरुणाचा दुतावासाकडे मदतीचा टाहो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.