ETV Bharat / state

नवापूर नगरपालिकेत बांधली मोकाट गुरे; आरपीआयचे अनोखे आंदोलन - नगराध्यक्षा हेमलता पाटील

शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आरपीआयचे तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोकाट गुरे बांधून अनोखे आंदोलन केले आहे.

नवापूर नगरपालिका
नवापूर नगरपालिका
author img

By

Published : Dec 25, 2020, 7:25 PM IST

नंदुरबार - नवापूर शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरे रस्त्यावर ठाण मांडुन बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट गुरांमुळे अनेक नागरीक जखमी झाले असून नगरपालिकेने मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी पालिकेच्या प्रवेशद्वारावर मोकाट गुरे बांधुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे

मोकाट गुरांचा उपद्रव; नागरिक हैरान-

नवापूर शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण झाले आहेत. अनेकदा ही मोकाट गुरे सैरावैरा धावत असल्याने अनेक नागरीक जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. मोकाट गुरांमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नगरपालिकेत बांधली मोकाट गुरे-

शहरात फिरणाऱ्या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी आरपीआयचे तथा माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोकाट गुरे बांधून अनोखे आंदोलन केले आहे. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही काळ नगरपालिकेत वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले होते.

आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित-

याप्रसंगी आंदोलक मागण्यांवर ठाम असल्याने नवापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण, मिलिंद भामरे यांनी आंदोलकांशी चर्चा करुन मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. परंतु आंदोलन स्थगित करण्यात येत असले तरी येत्या 15 दिवसात मोकाट गुरांचा बंदोबस्त न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

आरपीआयचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी-

यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नंदुरबार युवा जिल्हाध्यक्ष राहुल शिरसाठ, दिनेश नगराळे, नटु नगराळे, भटु नगराळे, सोहेब मिर्झा, प्रवीण तिरमली, रमीझ शेख, मुकेश गोसावी, सुनील राठोड, किरण झांझरे, अज्जु मक्राणी, राहुल सोनवणे, गोपी वाघ, संतोष तिरमली आदी उपस्थित होते.

हेही वाचा- डहाणू-जव्हार राज्य महामार्गावर सारणी येथे भीषण अपघात; वऱ्हाड नेणारा टेम्पो उलटला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.