नंदुरबार : धडगाव तालुक्यातील खडक्या येथील तरुणीच्या मृत्यू प्रकरणी Girl death in Dhadgaon Nandurbar तिच्या वडिलांच्या लढ्याला यश मिळालं असून या प्रकरणाचा तपास धडगाव पोलिसांकडून काढून विशेष तपास पथकाकडून Special Investigation Team करण्यात येणार आहे. या प्रकरणाबाबत राज्य महिला आयोगाने देखील पोलीस अधीक्षकांना पत्र State Commission for Women letter to Superintendent of Police पाठवून विशेष पथक नेमण्याची सांगितले आहे. पीडित महिलेचा मुंबई येथे पुर्नशवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान या गुन्ह्यातील तपासासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे.
राज्य महिला आयोगाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र - धडगाव तालुक्यातील खडके येथील महिलेच्या मृत्यूप्रकरणी राज्य महिला आयोगाने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना लेखी पत्र पाठवून विशेष पथकाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.
पथकात एक महिला अधिकाऱ्यांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेश - धडगाव तालुक्यातील खडक्या मधल्या महिलेचा मृत्यूच्या तपासासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकात एक महिला अधिकाऱ्यांसह तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेश आहे. यामध्ये शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयणा देवरे यांचा पथकात करण्यात आला. समावेश पथकाला मुदतीत तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली आहे.