ETV Bharat / state

नंदूरबार जिल्ह्यात 8 दिवसांचा जनता कर्फ्यू लावावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

नंदूरबार शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात 50 पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे नंदुरबार शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. शहरात वाढती गर्दी व सोशल डिस्टन्सिंगबाबत कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्यामुळे शहर कोरोना संकटाला आमंत्रण देत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

author img

By

Published : Jun 28, 2020, 5:04 PM IST

Updated : Jun 28, 2020, 8:23 PM IST

Demand for 8 days Janata curfew in Nandurbar district
नंदूरबार जिल्ह्यात 8 दिवसांचा जनता कर्फ्यू लावावा, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

नंदूरबार - शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शहरात 50 पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. त्यामुळे नंदुरबार शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू पाहत आहे. शहरात वाढती गर्दी व सोशल डिस्टन्सिंगबाबत कुठल्याही नियमांचे पालन होत नसल्यामुळे शहर कोरोना संकटाला आमंत्रण देत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात दररोज वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नंदुरबार शहरात ८ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात यावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

नंदूरबार शहर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठा गजबजल्या आहेत. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी व नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्स नसल्याने शहर कोरोनाला आमंत्रण देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसेंदिवस शहरात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, 3 दिवसात 78 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 50 रुग्ण नंदूरबार शहरातील असून, शहरात जनता कर्फ्यू लावावा आणि सर्व व्यवहार बंद ठेवण्यात यावेत, अशी मागणी नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्याचसोबत नंदूरबार जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बंदी करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

Last Updated : Jun 28, 2020, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.