नंदुरबार: धडगाव तालुक्यातील खडक्याच्या पीडित महिलेच्या संशयास्पद मृत्यू Nandurbar Trible woman death case प्रकरणात तब्बल 47 दिवसांनंतर तिच्यावर आदिवासी रिती रिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले आहे. शुक्रवारी जे.जे. रुग्णालयातून पार्शिव तिच्या गावी पोहचल्यानंतर तिला खड्यात पुरण्यात आले होते. मात्र तिचे वडील प्रवासात असल्याने शनिवारी सायंकाळी तिच्यावर आदिवासी रिती रिवाजाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. दुसरीकडे या घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस Devendra Fadwanis on Nandurbar Trible Woman Death यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. Neelam Gorhe criticized administration
दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी - या प्रकरणात भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी खडक्या येथे जाऊन सर्व चौकशी करत पीडिताच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी खटला जलतगती न्यायालयात चालवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. तर यातील दोषी पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबणाची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पीडित कुटुंबीयांवर दबाव आणणे चुकीचे-निलम गोऱ्हे
स्थानिक पोलिसांकडून पीडित महिलेच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप पिढी त्याच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत पीडिताचे कुटुंबीयांनावर यंत्रणेकडून दबाव आणल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिली. दोन इसमांनी पिडीत महिलेच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना दोन कागदावर स्वाक्षरी करुन देण्याची मागणी केली. यामध्ये मीडियाला कुठलीही माहीती देऊ नये आणि कोणीही याबाबत वृत्त प्रसारित करु नये अशा आशयाचा मचकूर होता. मात्र पीडिताच्या वडिलांना त्यावर अंगठा देण्यास नकार देत ही बाब फोनवरुन निलम गोऱ्हे यांना सांगितली. यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.